जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा : असित देसाई अजिंक्य; वेदांत कोल्हे उपविजेता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 08:37 PM2018-01-28T20:37:20+5:302018-01-28T22:07:17+5:30

अकोला : वसंत देसाई स्टेडियम बॅडमिंटन हॉल येथे रविवारी जिल्हास्तरीय १७ वर्षांआतील मुले बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन अकोला जिल्हा बॅडमिंटन अँण्ड शटर्ल्स असोसिएशनच्यावतीने केले होते. स्पर्धेतील अंतिम सामना असित देसाई व वेदांत कोल्हे यांच्यात झाला. असितने १९-२१,२१-१७,२१-१५ अशा गुणांनी सामना जिंकून अजिंक्यपद पटकावले.

District level badminton tournament: Asit Desai Ajinkya; Vedanta Koli runner-up | जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा : असित देसाई अजिंक्य; वेदांत कोल्हे उपविजेता!

जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा : असित देसाई अजिंक्य; वेदांत कोल्हे उपविजेता!

googlenewsNext
ठळक मुद्देरविवारी पार पडली जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : वसंत देसाई स्टेडियम बॅडमिंटन हॉल येथे रविवारी जिल्हास्तरीय १७ वर्षांआतील मुले बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन अकोला जिल्हा बॅडमिंटन अँण्ड शटर्ल्स असोसिएशनच्यावतीने केले होते. स्पर्धेतील अंतिम सामना असित देसाई व वेदांत कोल्हे यांच्यात झाला. असितने १९-२१,२१-१७,२१-१५ अशा गुणांनी सामना जिंकून अजिंक्यपद पटकावले.
प्रथम उपान्त्यफेरीचा सामना आशय कदम विरुद्ध वेदांत कोल्हे यांच्यात झाला. चुरशीच्या सामन्यात वेदांत कोल्हे याने २१-१८,२१-१७ ने विजय मिळविला. दुसरा उपान्त्य सामना असित देसाई विरुद्ध रोहन जिराफे यांच्यात झाला. असितने हा सामना २१-१९,२१-१५ ने जिंकला. अंतिम सामन्यात असित व वेदांतने उत्कृष्ट खेळप्रदर्शन केले. स्पर्धेत जिल्हय़ातील ३२ खेळाडू सहभागी झाले होते. उद्घाटनीय सामना अंश जैन व ओम वाडे यांच्यात होऊन अंश सरळसेटमध्ये विजेता ठरला.
स्पर्धेचे बक्षीस वितरण उद्योजक महेश मनवाणी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन तुषार देशमुख यांनी केले. स्पर्धेचे आयोजन असोसिएशनचे संचालक व प्रशिक्षक निषाद डिवरे यांनी केले. सकाळी स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय बॅडमिंटनपटू संग्राम गावंडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. प्रवीण अग्रवाल, मंगेश देशपांडे, प्रा. राऊत, सुनील शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.

Web Title: District level badminton tournament: Asit Desai Ajinkya; Vedanta Koli runner-up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.