नावीन्यपूर्ण संकल्पनांसाठी ‘डिस्ट्रिक्ट बिजनेस प्लॅन’ स्पर्धा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 03:42 PM2019-02-10T15:42:19+5:302019-02-10T15:42:29+5:30

अकोला : जनसामान्यांच्या नावीन्यपूर्ण संकल्पना पुढे आणण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्यावतीने राबविण्यात येणारी ‘डिस्ट्रिक्ट बिजनेस प्लॅन’ स्पर्धा योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती देत, नावीन्यपूर्ण संकल्पना राबविणाऱ्या जिल्ह्यातील नागरिकांनी या स्पर्धेत सहभाग घेण्याचे आवाहन कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शनिवारी केले.

'District Business Plan' competition for innovative concepts! | नावीन्यपूर्ण संकल्पनांसाठी ‘डिस्ट्रिक्ट बिजनेस प्लॅन’ स्पर्धा!

नावीन्यपूर्ण संकल्पनांसाठी ‘डिस्ट्रिक्ट बिजनेस प्लॅन’ स्पर्धा!

Next

अकोला : जनसामान्यांच्या नावीन्यपूर्ण संकल्पना पुढे आणण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्यावतीने राबविण्यात येणारी ‘डिस्ट्रिक्ट बिजनेस प्लॅन’ स्पर्धा योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती देत, नावीन्यपूर्ण संकल्पना राबविणाऱ्या जिल्ह्यातील नागरिकांनी या स्पर्धेत सहभाग घेण्याचे आवाहन कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शनिवारी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
‘डिस्ट्रिक्ट बिजनेस प्लॅन’ स्पर्धा योजनेद्वारे कृषी, ग्रामीण विकास, सेवा, शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्राशी निगडित नावीन्यपूर्ण आणि उत्कृष्ट संकल्पना मांडणाºया पाच व्यक्तींची जिल्हा स्तरावर निवड करण्यात येणार असून, निवड करण्यात आलेल्या पाच व्यक्तींना पाच लाख रुपयांचे कार्यादेश देण्यात येणार आहेत. यासंदर्भात प्राप्त प्रस्तावांची निवड जिल्हा निवड समितीद्वारे करण्यात येणार आहे. त्यासाठी १८ किंवा १९ फेबु्रवारी रोजी अकोल्यातील ‘आयटीआय’ येथे जिल्हास्तरीय मेळावा घेण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभाग घेणाºया जिल्ह्यातील नागरिकांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयांमध्ये अर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असून, या स्पर्धेचे नोडल अधिकारी म्हणून प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विभागीय स्तरावरील मेळावा २४ फेबु्रवारी रोजी अमरावती येथे घेण्यात येणार आहे, असे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले. त्यावेळी प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले व जिल्हा नियोजन अधिकारी ज्ञानेश्वर आंबेकर उपस्थित होते.

कौशल्य विकास कामांसाठी पाच कोटी!
जिल्ह्यातील कौशल्य विकास कामांसाठी शासनामार्फत पाच कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, जिल्ह्यातील स्थानिक गरजा विचारात घेऊन, दालमिल तसेच जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरी या क्षेत्रात कार्यरत उद्योजकांना कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था म्हणून मान्यता देऊन त्यांना गरजेनुसार कुशल मनुष्यबळ तयार करण्याची संधी देण्यात येणार आहे. यासोबतच रोजगार निर्मिती व व्यवसायात वाढ ही दोन्ही उद्दिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.


‘डिस्ट्रिक्ट बिजनेस प्लॅन ’स्पर्धा व ‘हिरकणी महाराष्ट्राची’ योजनांचे अनावरण!
केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने राबविण्यात येणाºया ‘डिस्ट्रिक्ट बिजनेस प्लॅन’ स्पर्धा व ‘हिरकणी महाराष्ट्राची’ या योजनांचे अनावरण शनिवारी सकाळी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते मुंबई येथील मंत्रालयातील ‘वार रूम’मध्ये ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग‘द्वारे करण्यात आले. यावेळी कौशल्य विकास उद्योजकता मंत्री संभाजी पाटील निलंगेकर उपस्थित होते. या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनीही सहभाग घेतला. ‘हिरकणी महाराष्ट्राची’ या योजनेद्वारे ग्रामीण भागातील महिला बचत गटांना आर्थिक पाठबळ मिळणार असून, त्यांच्या उत्पादनांना व नावीन्यपूर्ण संकल्पनांना उद्योगाचे व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याची माहितीही पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिली.

 

Web Title: 'District Business Plan' competition for innovative concepts!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.