विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाच्या  ऑनलाइन टेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 05:35 PM2020-05-13T17:35:16+5:302020-05-13T17:35:24+5:30

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने एक हजार आॅनलाइन टेस्ट तयार केल्या अहेत.

Department of Education online test for students | विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाच्या  ऑनलाइन टेस्ट

विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाच्या  ऑनलाइन टेस्ट

Next

अकोला : अकोला : लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांना शालेय उपक्रमात गुंतवून ठेवण्यासाठी शालेय शिक्षण मंत्र्यांनी दिलेल्या निदेर्शानुसार जिल्हा परिषद शाळांमध्येही स्टडी फ्रॉम होम उपक्रम सुरू ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने एक हजार आॅनलाइन टेस्ट तयार केल्या अहेत. इतर जिल्हा परिषदांनाही त्याचा वापर करता यावा, यासाठी लिंकद्वारे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ३० जूनपर्यंत व्हाटसअ‍ॅप, फेसबुकद्वारे आॅनलाइन पद्धतीने विविध उपक्रम राबवण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांनी सर्वच गटशिक्षणाधिकाऱ्यांना एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच दिले होते.
कोरोना विषाणूच्या प्रकोपाला रोखणासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील सर्वच शाळा १८ मार्चपासून बंद आहेत. या काळात विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाठ्यक्रम रखडला. तसेच परिक्षाही होणार नाही. या परिस्थितीत विद्यार्थ्यांची गुणवत्ता टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान शिक्षण विभागापुढे उभे ठाकले. सद्यस्थितीत सर्वत्र वर्क फ्रॉम होम सुरू आहे. त्याच धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी ह्यस्टडी फ्रॉम होमह्ण उपक्रम सुरू करण्याचा आदेश शालेय शिक्षण मंत्र्यांनी ६ एप्रिल रोजीच्या व्हिडिओ कॉन्फरंसिंगमध्ये दिला होता. त्यामध्ये मराठी व उर्दू माध्यमाच्या इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंत द्वितीय सत्रावर आधारित शैक्षणिक उपक्रम तयार करण्यासाठी जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, अकोला यांच्या सोबतीने उपक्रमाची तयारी करण्यात आली. त्यासाठी नियुक्त कार्यकारी मंडळाने उपक्रम तयार केले.

Web Title: Department of Education online test for students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.