न्यायालयात नेताना आरोपीचा मृत्यू

By admin | Published: September 19, 2014 12:50 AM2014-09-19T00:50:49+5:302014-09-19T00:50:49+5:30

बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने देशी कट्टा बाळगल्याप्रकरणी केली होती अटक.

The death of the accused in the court | न्यायालयात नेताना आरोपीचा मृत्यू

न्यायालयात नेताना आरोपीचा मृत्यू

Next

मलकापूर (बुलडाणा): देशी कट्टा बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींना, न्यायालयासमोर हजर करण्यासाठी नेत असताना त्यातील एकाचा न्यायालय परिसरातच मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी घडली. पोलिसांनी मारहाण केल्यामुळे आरोपीचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे.
बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मलकापूर येथील सालीपुरा परिसरातील गंगासिंग झामसिंग राजपूत (वय ३५) आणि नटवरसिंग राजपूत (वय २७) या दोघा भावांना देशीकट्टा आणि काडतुसांसह बुधवारी अटक करून मलकापूर पोलिसांच्या ताब्यात दिले होते. दरम्यान, गुरूवारी या दोन्ही आरोपींना पोलीस न्यायालयात हजर करण्यासाठी नेत असताना, त्यापैकी गंगासिंग झामसिंग राजपूत हा न्यायालय परिसरातच चक्कर येवून कोसळला आणि लगेच त्याचा मृत्यू झाला. यावेळी शहरातील नागरिकांनी उपजिल्हा रूग्णालयात एकच गर्दी केली. या प्रकारामुळे रूग्णालय परिसरातील वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले होते. शहर पोलिसांनी सतर्कता म्हणून दंगल नियंत्रण पथकासह मोठी कुमक रूग्णालय बंदोबस्तासाठी लावली होती. आरोपीच्या मृत्यूप्रकरणी विविध तर्कवितर्क लावले जात असले तरी, त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल.

Web Title: The death of the accused in the court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.