सेवा व उत्पादनाचा लाभ घेताना ग्राहकांनी दक्षता बाळगावी - नरेंद्र टापरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 04:03 PM2017-12-26T16:03:01+5:302017-12-26T16:05:29+5:30

अकोला: ग्राहकांच्या समस्या व अडचणी सोडविण्यासाठी प्रशासन कटीबद्ध आहे. ग्राहकांनी सेवा वउत्पादनाचा लाभ घेताना दक्षता बाळगावी, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी नरेंद्र टापरे यांनी मंगळवारी येथे केले.

Customers should be careful while taking advantage of service and product - Narendra Tapare | सेवा व उत्पादनाचा लाभ घेताना ग्राहकांनी दक्षता बाळगावी - नरेंद्र टापरे

सेवा व उत्पादनाचा लाभ घेताना ग्राहकांनी दक्षता बाळगावी - नरेंद्र टापरे

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात २४ डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन करण्यात आले होते.श्रीमती एस.एम.उंटवाले यांनी प्रशासन व ग्राहक संघटनांनी समन्वय साधुन प्रसंगी ग्राहकमंच मध्ये प्रकरण दाखल करुन ग्राहक चळवळ राबवावी, असे सांगितले.

अकोला: ग्राहकांच्या समस्या व अडचणी सोडविण्यासाठी प्रशासन कटीबद्ध आहे. ग्राहकांनी सेवा वउत्पादनाचा लाभ घेताना दक्षता बाळगावी, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी नरेंद्र टापरे यांनी मंगळवारी येथे केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात २४ डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा ग्राहक मंच अकोलाच्या अध्यक्षा एस.एम.उंटवाले होत्या. कार्यक्रमात जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष शिंदे, अ.भा. ग्राहक पंचायत चे श्रीराम ठोसर, सुधाकर जकाते, आर. डी. अहिर अखिल भारतीय ग्राहक संरक्षण परिषदचे अध्यक्ष मनोहर गंगाखेडकर, ग्राहक संघटनेचे प्रतीनिधी, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीमती एस.एम.उंटवाले यांनी प्रशासन व ग्राहक संघटनांनी समन्वय साधुन प्रसंगी ग्राहकमंच मध्ये प्रकरण दाखल करुन ग्राहक चळवळ राबवावी, असे सांगितले. ठोसर यांनी ग्राहक संघटनांचे सदस्य तसेच पदाधिकारी हे ग्राहकांच्या हितासाठी सर्वोतापरी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. तसेच ग्राहकांनी आपल्या हक्का करीता न घाबरता लेखी स्वरुपात तक्रार देण्याचे आवाहन त्यांनी केले.यावेळी प्रशासन व ग्राहक संघटनांनी समन्वय साधुन प्रंसगी ग्राहक मंच मध्ये प्रकरण दाखल करुन ग्राहक चळवळ राबवावी असे विचार मनोहर गंगाखेडकर, सुधाकर जकाते आर. डी. अहिर यांनी मांडले. शासकीय यंत्रणेकडून बी.एस.एन.एलचे राजेश सोनवणे, महावितरणच्या स्वाती जाधव, व अन्न व औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत अस्वार यांनी ग्राहकांना वजनमापे तसेच औषधे या बाबत आवश्यक ती माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रकाश अंधारे यांनी तर प्रास्तावीक सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी औदूंबर पाटील यांनी केले. जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष शिंदे यांनी आभार व्यक्त केले.

विविध विभागांचे स्टॉल
यावेळी श्री. सदगुरू इंडेन गॅस कंपनी,अकोला गॅस एजन्सी, स्वच्छ भारत मिशन, भारत संचार निगम लिमीटेड, महावितरण, वैधमापनशास्त्र, अन्न व औषध प्रशासन आदी विभागांनी जनजागृती साठी माहितीपर स्टॉल लावले.

Web Title: Customers should be careful while taking advantage of service and product - Narendra Tapare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.