मामाच्या गावाला कोरोनाचे कुंपण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:17 AM2021-05-23T04:17:28+5:302021-05-23T04:17:28+5:30

चिमुकल्यांचा हिरमोड : विजय शिंदे अकोट : कधी एकदाची शाळा संपते, परीक्षा होताच उन्हाळ्याची सुट्टी लागते अन् मामाच्या गावाला ...

Corona fence to uncle's village! | मामाच्या गावाला कोरोनाचे कुंपण!

मामाच्या गावाला कोरोनाचे कुंपण!

Next

चिमुकल्यांचा हिरमोड :

विजय शिंदे

अकोट : कधी एकदाची शाळा संपते, परीक्षा होताच उन्हाळ्याची सुट्टी लागते अन् मामाच्या गावाला जातो... अशा बेचैन करणाऱ्या परिस्थितीला रोखण्यासाठी मामाच्या गावाच्या वेशीवर कोरोनाचे कुंपण घातले गेले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हौशी चिमुकल्यांचा हिरमोड झाल्याची स्थिती सद्या घराघरांत आहे.

उन्हाळ्याची चाहूल लागली की, मामाच्या घरी आंबे खाण्याची मौज, आमराईतील डाबडुबलीचे खेळ, झाडावर झोके, नदीवर पोहायला जाण्याची ओढ आता कोरोनाने हिरावून घेतली आहे. मोबाईलच्या अतिवापराने मामाचे पत्र हिरावून घेतले. अशातच आता कोरोनामुळे मुलांचे मामाचे गाव दोन वर्षांपासून सुटल्याची खंत चिमुकल्यांना बोचत आहे. उन्हाळ्याची सुट्टी मामाच्या गावी घालविण्याच्या आनंदावर विरजण पडले. कोरोनाच्या संक्रमणाचा धोका लक्षात घेता लग्न, अंत्यसंस्कार करण्यासाठी शासनाने माणसांची उपस्थिती मर्यादित केली आहे. त्यामुळे कोरोनाच्या दोन्ही लाटेत मुलांची घरच शाळा झाली आहे.

------------------------------------

शाळा बंद, मोबाईलचा वापर वाढला!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने मुले घरीत आहेत. ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे मुलांमध्ये मोबाईलचा वापर वाढला असून, मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढला आहे. सद्य:स्थितीत मोबाईल हे जीवनावश्यक साधन झाल्याचे चित्र आहे.

---------------------

सोशल मीडियावरच मामाची भेट

मामाच्या गावाला जाण्यासाठी चिमुकली व्याकूळ झाल्याचे चित्र आहे, परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. शिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही मामांच्या गावात गावसीमा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नातेवाईक एकमेकांच्या घरी जाणे टाळत आहेत. नातेसंबंधाची भेट दुरावली असली, तरी सोशल मीडियावरच मामाच्या गावाची हौश भागवावी लागत असल्याचे दिसून येत आहे.

.............

Web Title: Corona fence to uncle's village!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.