संगणक लंपास प्रकरण; माजी विद्यार्थीच निघाले चोरटे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 01:02 AM2017-11-08T01:02:48+5:302017-11-08T01:03:14+5:30

बाश्रीटाकळी येथील गुलाम नबी आझाद महाविद्यालयातील संगणक अज्ञात चोरट्यांनी २४ जुलै २0१७ रोजी लंपास केले होते. याप्रकरणी बाश्रीटाकळी पोलिसांनी ६ नोव्हेंबर रोजी एकास अटक केली असून, तो याच महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी असल्याचे समोर आले आहे. 

Computer Lapse Case; Ex-students go extortion! | संगणक लंपास प्रकरण; माजी विद्यार्थीच निघाले चोरटे!

संगणक लंपास प्रकरण; माजी विद्यार्थीच निघाले चोरटे!

Next
ठळक मुद्देबाश्रीटाकळी येथील गुलाम नबी आझाद महाविद्यालयातील प्रकारअज्ञात चोरट्यांनी २४ जुलै रोजी लंपास केले होते महाविद्यालयातील संगणक 

लोकमत न्यूज नेटवर्क
बाश्रीटाकळी/ सायखेड : बाश्रीटाकळी येथील गुलाम नबी आझाद महाविद्यालयातील संगणक अज्ञात चोरट्यांनी २४ जुलै २0१७ रोजी लंपास केले होते. याप्रकरणी बाश्रीटाकळी पोलिसांनी ६ नोव्हेंबर रोजी एकास अटक केली असून, तो याच महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी असल्याचे समोर आले आहे. 
बाश्रीटाकळी येथील गुलाम नबी आझाद महाविद्यालयात अज्ञात चोरट्यांनी २४ जुलै रोजी प्रवेश करून लॅबमधील एक लाख रुपयांचे संगणक लंपास केले होते. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध कलम ४५७, ३८0 नुसार गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणातील आरोपी वरखेड शिवारात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संदीप रमेश खंडागळे (२५) यास अटक केली. या प्रकरणातील एक आरोपी पसार झाला आहे. दोन्ही आरोपी महाविद्यालयात सन २0१४-१५ शिक्षण घेत होते. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, ठाणेदार सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनात संजय सोनोने, सूर्यकांत डोईफोडे, संतोष वाघमारे यांनी केली. 

Web Title: Computer Lapse Case; Ex-students go extortion!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.