अकोला जिल्ह्यातील ५० गावात राष्ट्रसंतांची सामुदायिक प्रार्थना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 12:26 PM2018-10-16T12:26:00+5:302018-10-16T12:28:51+5:30

अकोला: ग्रामगीता विचार युवा मंचच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५० व्या सुवर्ण पुण्यतिथीनिमित्त अकोला जिल्ह्यात ५० गावात रविवारी नित्यनियामित सामुदायिक प्रार्थना सुरू करण्यात आली आहे.

Community Prayers in 50 villages of Akola district | अकोला जिल्ह्यातील ५० गावात राष्ट्रसंतांची सामुदायिक प्रार्थना

अकोला जिल्ह्यातील ५० गावात राष्ट्रसंतांची सामुदायिक प्रार्थना

googlenewsNext
ठळक मुद्देचौथी सामुदायिक प्रार्थना बार्शीटाकळी तालुक्यातील एरंडा या गावी उत्साहात पार पडली.पाच तरुणांनी व पाच तरुणींनी दररोज नित्यनियमित सामुदायिक प्रार्थना करण्याचा संकल्प केला.

अकोला: ग्रामगीता विचार युवा मंचच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५० व्या सुवर्ण पुण्यतिथीनिमित्त अकोला जिल्ह्यात ५० गावात रविवारी नित्यनियामित सामुदायिक प्रार्थना सुरू करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील चौथी सामुदायिक प्रार्थना बार्शीटाकळी तालुक्यातील एरंडा या गावी उत्साहात पार पडली. यावेळी गावातून फेरी काढण्यात आली.
त्यानंतर सामुदायिक प्रार्थना पार पडली. आर.आय. शेख गुरुजी, डॉ. अजय उपाध्याय, शुभम वरणकार, मुकेश वाकोड यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले व नित्यनियामित सामुदायिक प्रार्थना सुरू ठेवण्याचे आवाहन केले. नंतर एरंडा गावातील पाच तरुणांनी व पाच तरुणींनी दररोज नित्यनियमित सामुदायिक प्रार्थना करण्याचा संकल्प केला. दिलीप फाटकर, शंकर पाटील, नरेंद्र्र शर्मा व समस्त गावकरी मंडळी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. कार्यक्रमाला आर.आय. शेख गुरुजी, डॉ. अजय उपाध्याय, दीपक लुले, काशीराम लोखंडे, आत्माराम म्हात्रे, ग्रामगीता विचार युवा मंचचे प्रा. शुभम वरणकार (जिल्हा समन्वयक), डॉ. रामजी उपाध्याय, मुकेश वाकोडे, मोहन लुले, दिलीप कराळे, श्याम ब्राह्मणकर व सर्व गुरुदेव सेवक व गावकरी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रा. शुभम वरणकार यांनी केले.
 

 

Web Title: Community Prayers in 50 villages of Akola district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.