अकोल्यात ख्रिस्ती बांधवांनी केला नाताळ हर्षोल्हासात साजरा

By atul.jaiswal | Published: December 25, 2017 06:34 PM2017-12-25T18:34:28+5:302017-12-25T18:46:19+5:30

अकोला : प्रेम आणि बंधूभावाची शिकवण देणारे प्रभू येशू ख्रिस्त यांचा जन्मोत्सव ख्रिसमस अर्थात नाताळ २५ डिसेंबर रोजी जगभरात साजरा केला जातो. अकोला शहर आणि जिल्ह्यातही सोमवारी नाताळ हा सण मोठ्या हर्षोल्हासात साजरा करण्यात आला.

Christian brothers celebrated Christmas with joy in akola | अकोल्यात ख्रिस्ती बांधवांनी केला नाताळ हर्षोल्हासात साजरा

अकोल्यात ख्रिस्ती बांधवांनी केला नाताळ हर्षोल्हासात साजरा

Next
ठळक मुद्देशहरातील सर्व चर्च रोषणाईने उजळून निघाल्या.सकाळी सर्वच चर्चेसमधून प्रार्थनासभांचे आयोजन करण्यात आले होते.ख्रिस्ती बांधवांनी दिल्या नाताळाच्या शुभेच्छा.

अकोला : प्रेम आणि बंधूभावाची शिकवण देणारे प्रभू येशू ख्रिस्त यांचा जन्मोत्सव ख्रिसमस अर्थात नाताळ २५ डिसेंबर रोजी जगभरात साजरा केला जातो. अकोला शहर आणि जिल्ह्यातही सोमवारी नाताळ हा सण मोठ्या हर्षोल्हासात साजरा करण्यात आला. यावेळी ख्रिश्चन बंधू - भगिनींनी एकमेकांना विविध भेटवस्तू, शुभेच्छापत्रे देऊन परस्परांचे अभिनंदन केले. शहरातून एक भव्य रॅलीही काढण्यात आली. ख्रिसमसनिमित्त सुमारे १६० वर्षांचा इतिहास असणारी अकोल्यातील एकमेव ख्रिश्चन कॉलनी घरांना करण्यात आलेल्या रंगरंगोटी आणि रोषणाईने झगमगून आणि उजळून निघाली. शहरात ख्रिश्चन धर्मियांच्या धार्मिकस्थळांची म्हणजेच चर्चचीदेखील सजावट आणि रोषणाई करण्यात आली आहे. विविध ठिकाणी ख्रिसमस ट्री आणून त्यांच्यावर रोषणाई करण्यात आली आहे. अनेक चर्चेसमध्ये येशूच्या जन्माचे देखावे सादर करण्यात आले आहेत.
२४ डिसेंबरच्या रात्री ख्रिश्चन अबालवृद्धांनी विविध चर्चेसद्वारे आयोजित पार्टीमध्ये सहभागी होऊन रात्रभर घरोघरी भेटी देऊन ख्रिस्तजन्माची गीते गायिली आणि एकमेकांना ख्रिस्त जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. सांताक्लॉजच्या वेषातील युवक - युवती यावेळी सर्वांच्याच आकर्षणाचा वेंष्ठद्रबिंदू ठरले. सोमवार, २५ डिसेंबर रोजी सकाळी सर्वच चर्चेसमधून प्रार्थनासभांचे आयोजन करण्यात आले होते. खिश्चन कॉलनी येथील बेथेल सेव्हिअर्स अलायन्स चर्चमध्ये रेव्हरंड सुधाकर डोंगरदिवे यांनी ख्रिसमसचा संदेश दिला. इतरही चर्चेसमधून धर्मगुरुंनी ख्रिस्तजन्मावर आधारित संदेश दिले. सध्या जगातील संघर्ष आणि अराजकतेची परिस्थिती पाहता जगाला प्रभू येशूने दिलेल्या शांती, प्रेम, बंधुभाव आणि त्याग यासंदभार्तील शिकवण आचरणात आणण्याची गरज असल्याचे डोंगरदिवे यांनी सांगितले. चर्चेसमध्ये यावेळी संडेस्वूष्ठल, महिला संघ, तरुण संघ यांनी ख्रिस्तजन्मावर आधारित गीते सादर केली.


शांती यात्रा ने वेधले लक्ष
दुपारी साडेतीन वाजता अशोक वाटिका नजीकच्या अलायन्स चर्च, कॉन्फरन्स सेंटर येथून ख्रिसमसनिमित्त भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत हजारो खिश्चन अबालवृद्ध मोठ्या आनंदाने सहभागी झाले होते. या शोभायात्रेत येशू जन्माचे देखाव्यांसह इतर देखावे सादर करण्यात आले.


शिकवण आचरणात आणा - रेव्हरंड सुधाकर डोंगरदिवे
प्रभू येशू ख्रिस्तांनी दिलेली प्रेम, बंधुभाव आणि त्यागाची शिकवण आचरणात आणा, असे आवाहन रेव्हरंड सुधाकर डोंगरदिवे यांनी सोमवारी येथे केले. प्रभू येशू ख्रिस्तांच्या जन्मदिवसानिमित्त खदान ख्रिश्चन कॉलनी येथील बेथेल सेव्हिअर्स अलायन्स चर्च येथे आयोजित प्रार्थना सभेमध्ये ते बोलत होते.

 

 

Web Title: Christian brothers celebrated Christmas with joy in akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.