अकोल्यात बिल्डिंग पेंटर बांधकाम मजूर संघटनेने काढला मोर्चा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 06:29 PM2018-03-12T18:29:44+5:302018-03-12T18:29:44+5:30

अकोला :मागण्यांसाठी बिल्डिंग पेंटर बांधकाम मजूर असोसिएशनच्यावतीने सोमवार, १२ मार्च रोजी कामगार उपायुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. अशोक वाटिका येथून घोषणा देत हा मोर्चा उपायुक्त कार्यालयावर धडकला. तेथे मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

Building Painter Construction Workers Association rally in akola | अकोल्यात बिल्डिंग पेंटर बांधकाम मजूर संघटनेने काढला मोर्चा 

अकोल्यात बिल्डिंग पेंटर बांधकाम मजूर संघटनेने काढला मोर्चा 

Next
ठळक मुद्देबिल्डिंग पेंटर बांधकाम मजूर असोसिएशनच्यावतीने सोमवार, १२ मार्च रोजी कामगार उपायुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. अशोक वाटिका येथून घोषणा देत हा मोर्चा उपायुक्त कार्यालयावर धडकला. तेथे मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

अकोला : इतर बांधकाम कल्याण मंडळ (मजूर, कामगार मंडळ) तर्फे नोंदणीकृत मजुरांना शासकीय अनुदान म्हणून अवजारे खरेदीसाठी निधी मंजूर आहे. परंतु, कामगारांसाठीचा शासन निर्णयानुसार ३० दिवसांच्या आत नोंदणी केलेल्या कामगार, मजुरांना अद्यापही निधी मंजूर केला नाही. हा निधी मंजूर करावा आणि इतर योजनांची त्वरित अंमलबजावणी व्हावी, या मागण्यांसाठी बिल्डिंग पेंटर बांधकाम मजूर असोसिएशनच्यावतीने सोमवार, १२ मार्च रोजी कामगार उपायुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. अशोक वाटिका येथून घोषणा देत हा मोर्चा उपायुक्त कार्यालयावर धडकला. तेथे मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
मोर्चामध्ये जिल्हाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, विभागीय अध्यक्ष विनोद तायडे, प्रशांत मेश्राम, पंचशील गजघाटे, राजू कीर्तक, सुरेश कारंडे,अब्दुल बशीर, शेख लाल, युवराज खडसे, गौतम मोटघरे, गणेश सावळे, आत्माराम साठे, गणेश नृपनारायण, सतीश वाघ, अनिल वाघमारे, उमेश अवचार, अब्दुल जमील, शेख मिराज, बाबूलाल डोंगरे, शेख अशफाक, सुनील तायडे, अब्दुल जमीर, शेख अहमद, शेख अशफाक, सुनील वंजारी, सतीश वाघ, प्रवीण खंडारे, गुणवंत शिरसाट, महेश तायडे, माणिक मोरे, मनोज बाविस्कर, भास्कर सोनोने, संतोष नेरकर, मदन वासनिक, मदन भगत, सत्यशील बावनगडे, सुनील अवचारे, गजानन लोखंडे, सुरेश बोदडे, बाळू ढोकणे, संदीप सावळे, शंकर धुर्वे यांच्यासह महिला व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
13सीटीसीएल

 

Web Title: Building Painter Construction Workers Association rally in akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.