जातीधर्माच्या भिंती तोडून चांगली माणसं घडवूया- प्रा. शरद पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 07:32 PM2018-06-24T19:32:16+5:302018-06-24T19:34:29+5:30

मूर्तिजापूर : जनमचाने विद्यार्थी घडविण्याचे काम हाती घेतले असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आता शिकवणीसाठी पैसे खर्च करण्याची गरज नाही, जनमंच ने आता प्रकाशवाट पारदर्शी प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थ्यांमधला जातीधर्माच्या भिंती तोडून चांगले माणसं घडवूया असे प्रतिपादन जनमंच अध्यक्ष नागपूर प्रा. शरद पाटील यांनी केले.

broke caste walls and creating good human beings - Sharad Patil | जातीधर्माच्या भिंती तोडून चांगली माणसं घडवूया- प्रा. शरद पाटील

जातीधर्माच्या भिंती तोडून चांगली माणसं घडवूया- प्रा. शरद पाटील

Next
ठळक मुद्दे'प्रकाशवाट' या पथदर्शी प्रकल्पाच्या पहिल्या सत्राचा समारोप  २४ जून सकाळी साडेअकरा वाजता संपन्न झाला. व्यक्तिमत्त्व विकासाचे मोफत शिक्षण दिल्या जाणारा हा पथदर्शी प्रकल्प तीन वर्षात संपूर्ण विदर्भात राबविला जाणार. कार्यक्रमाचे संचालन अली सर यांनी केले तर आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

मूर्तिजापूर : जनमचाने विद्यार्थी घडविण्याचे काम हाती घेतले असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आता शिकवणीसाठी पैसे खर्च करण्याची गरज नाही, जनमंच ने आता प्रकाशवाट पारदर्शी प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थ्यांमधला जातीधर्माच्या भिंती तोडून चांगले माणसं घडवूया असे प्रतिपादन जनमंच अध्यक्ष नागपूर प्रा. शरद पाटील यांनी केले. ते नागपूरच्या 'जनमंच'ने दहावी च्या ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी येथील भारतीय ज्ञानपीठ विद्यालयात २० मे पासून सुरू केलेल्या 'प्रकाशवाट' या पथदर्शी प्रकल्पाच्या पहिल्या सत्राचा समारोप  २४ जून सकाळी साडेअकरा वाजता संपन्न झाला.  त्या कार्यक्रमात बोलत होते . अकोला जिल्हा परिषदेचे शिक्षण शिक्षणाधिकारी (माध्यमिक ) यांच्या अध्यक्षतेखालील या समारोप समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून 'अस्पायर'चे संचालक सचिन बुरघाटे, प्रा. शरद पाटील, अमिताभ पावडे, प्रमोद पांडे,डॉ. राजा आकास, विकास सावरकर, येथील संपादक बाळ कुळकर्णी उपस्थित होते. तालुक्याच्या ग्रामीण भागातील सर्व शाळांमधील नववीतील पहिल्या तीन क्रमांकाच्या १०५ विद्यार्थ्यांना इंग्रजी, गणीत व विज्ञान या विषयांच्या तयारीसह व्यक्तिमत्त्व विकासाचे मोफत शिक्षण दिल्या जाणारा हा पथदर्शी प्रकल्प तीन वर्षात संपूर्ण विदर्भात राबविला जाणार असून या प्रकल्पाच्या पहिल्या वर्षातील पहिल्या टप्प्याच्या समारोप समारंभाला नागरिक, विद्यार्थी,प्रकाशवाट प्रकल्प चमू, नागपूर वरुन आलेले मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते,कार्यक्रमाचे संचालन अली सर यांनी केले तर आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. (शहर प्रतिनिधी)

Web Title: broke caste walls and creating good human beings - Sharad Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.