अपार्टमेंटमध्ये पार्किंगच्या जागेवर उभारले बॉयलर; मनपाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 01:36 PM2018-05-24T13:36:08+5:302018-05-24T13:40:50+5:30

अकोला: गोरक्षण रोडवरील कल्पतरू अपार्टमेंटमधील सदनिकाधारकांसाठी राखीव असणाऱ्या पार्किंगच्या जागेवर हॉटेल वैभवच्या संचालकांनी चक्क बॉयलर उभारले असून, यामुळे स्थानिक रहिवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.

Boiler built in the parking space in the apartment | अपार्टमेंटमध्ये पार्किंगच्या जागेवर उभारले बॉयलर; मनपाचे दुर्लक्ष

अपार्टमेंटमध्ये पार्किंगच्या जागेवर उभारले बॉयलर; मनपाचे दुर्लक्ष

Next
ठळक मुद्दे महापालिका प्रशासनाने हॉटेल वैभवच्या इमारतीचा काही भाग हटविण्याचे निर्देश हॉटेल संचालकांना दिले होते. हॉटेलच्या इमारतीचा काही भाग संचालक ांनी हटविल्यानंतर चक्क त्याच अपार्टमेंटमधील पार्किंगच्या जागेवर बॉयलर उभारले. या बॉयलरमुळे उन्हाच्या दाहकतेत वाढ झाली असून, इमारतीला तडे जात आहेत.


अकोला: गोरक्षण रोडवरील कल्पतरू अपार्टमेंटमधील सदनिकाधारकांसाठी राखीव असणाऱ्या पार्किंगच्या जागेवर हॉटेल वैभवच्या संचालकांनी चक्क बॉयलर उभारले असून, यामुळे स्थानिक रहिवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. यासंदर्भात महापालिका प्रशासनाला वारंवार पत्र, निवेदन दिल्यावरसुद्धा प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याची माहिती कल्पतरू अपार्टमेंट निवासी व व्यावसायिक हक्क समितीच्या पदाधिकाºयांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी रहिवाशांनी केली.
गोरक्षण रोडवर इन्कमटॅक्स चौकातील ‘बॉटल नेक’दूर करण्याच्या उद्देशातून महापालिका प्रशासनाने हॉटेल वैभवच्या इमारतीचा काही भाग हटविण्याचे निर्देश हॉटेल संचालकांना दिले होते. त्यानुसार कल्पतरू अपार्टमेंटमधील हॉटेलच्या इमारतीचा काही भाग संचालक ांनी हटविल्यानंतर चक्क त्याच अपार्टमेंटमधील पार्किंगच्या जागेवर बॉयलर उभारले. अपार्टमेंटमधील सदनिकाधारकांसाठी राखीव असणाºया पार्किं गच्या जागेवर मनपा प्रशासनाच्या परवानगीशिवाय बॉयलर उभारण्यात आल्याची माहिती यावेळी अपार्टमेंटमधील रहिवाशी व व्यावसायीकांनी दिली. या बॉयलरमुळे उन्हाच्या दाहकतेत वाढ झाली असून, इमारतीला तडे जात आहेत. निवासी गाळ््यामध्ये बॉयलर व स्वयंपाकगृह सुरू केल्यामुळे रहिवाशांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. मनपाच्या परवानगीशिवाय निवासी सदनिकेचा व्यावसायिक वापर केला जात असून, बॉयलरमुळे मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता रहिवाशांनी व्यक्त केली. इमारतीमधील अतिक्रमण, उभारलेले बॉयलर व व्यावसायिक उद्देशातून होणारा वापर पाहता इमारतीला धोका निर्माण झाल्याची माहिती कल्पतरू अपार्टमेंट निवासी व व्यावसायिक हक्क समितीच्या पदाधिकाºयांनी यावेळी दिली. यासंदर्भात मनपा प्रशासनासह खदान पोलीस ठाण्यात निवेदने, तक्रार केल्यानंतरही कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात सापडला आहे. भविष्यात कल्पतरू अपार्टमेंटमध्ये काही दुर्घटना घडल्यास त्याला सर्वस्वी मनपा आयुक्त, क्षेत्रीय अधिकारी, परवाना विभाग प्रमुख, नगररचना विभाग प्रमुख आदी जबाबदार राहतील, असे यावेळी रहिवाशांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला इमारतीमधील रहिवासी धर्मेश बिलाखिया, विजय सिरसाट, पी.ई. शेगावकर, विजय सपकाळ, ए.आर.खान, मिलिंद सपकाळ, आशिष बिलाखिया, व्यावसायिक हरिभाई केसरवाणी, संजय गावंडे, सारंगधर हंतोडे, ओमप्रकाश राठी, हितेश जोगी आदी उपस्थित होते.

 

 

Web Title: Boiler built in the parking space in the apartment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.