धनगर आरक्षणासाठी नागपूर विधान भवनावर सोमवारी हल्लाबोल मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 10:49 PM2017-12-08T22:49:56+5:302017-12-08T22:53:54+5:30

राज्यघटनेमध्ये धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण दिलेले  असताना, राज्य शासन आरक्षणाची अंमलबजावणी करीत नाही. धनगर व धनगड  असा भेद करून ७0 वर्षांपासून धनगरांना आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आले.  आरक्षणाच्या प्रमुख मागणीसाठी सकल धनगर समाजाच्यावतीने नागपूर विधान  भवनावर ११ डिसेंबर रोजी यशवंत स्टेडियम येथून हल्लाबोल मोर्चा काढण्यात  येणार आहे. 

Attack on Nagpur Legislative Assembly on Monday for attack on Dhangar | धनगर आरक्षणासाठी नागपूर विधान भवनावर सोमवारी हल्लाबोल मोर्चा

धनगर आरक्षणासाठी नागपूर विधान भवनावर सोमवारी हल्लाबोल मोर्चा

Next
ठळक मुद्देधनगर व धनगड असा भेद करून धनगरांना ठेवले आरक्षणापासून वंचित आरक्षणाच्या प्रमुख मागणीसाठी सकल धनगर समाजाच्या मोर्चाचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : राज्यघटनेमध्ये धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण दिलेले  असताना, राज्य शासन आरक्षणाची अंमलबजावणी करीत नाही. धनगर व धनगड  असा भेद करून ७0 वर्षांपासून धनगरांना आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आले.  आरक्षणाच्या प्रमुख मागणीसाठी सकल धनगर समाजाच्यावतीने नागपूर विधान  भवनावर ११ डिसेंबर रोजी यशवंत स्टेडियम येथून हल्लाबोल मोर्चा काढण्यात  येणार आहे. 
हल्लाबोल मोर्चाच्या तयारीसंदर्भात जि.प. विश्रामगृहावर धनगर समाज संघटनेची  बैठक पार पडली. अध्यक्षस्थानी माजी आ. हरिदास भदे होते. प्रमुख मार्गदर्शक  म्हणून जि.प. माजी सभापती बळीराम चिकटे, माजी जि.प. सदस्य दिनकर नागे,  दिनकर पातोंड, सेवानवृत्त अभियंता वसंतराव भदे, माजी नगरसेविका पुष्पा  गुलवाडे, महादेवराव साबे, दीपक नागे, मनोज करणकार, संजय गाडगे, धनगर  समाज संघटनेचे अकोला तालुकाध्यक्ष गोपाल गावंडे आदी होते. धनगर समाजाला  एसटीचे आरक्षण मिळावे. यासाठी हल्लाबोल मोर्चा काढण्यात येत असून, या  मोर्चामध्ये जिल्हय़ातील धनगर समाज बांधवांनी सहभागी व्हावे. असे आवाहन  माजी आ. हरिदास भदे, बळीराम चिकटे यांनी केले. सभेला माजी पं.स. सदस्य  दादाराव सुलताने, मोहन लाखे, शंकरराव कोगदे, मनोहर भदे, अंबादास नागे,  देवानंद नवलकार, बाळासाहेब खराटे, कैलास बचे, यशवंत नागे, विजय बोदडे,  राजेश लाखे, राजेश सोनाग्रे, नितीन कोगदे, रवी काळे, सचिन बचे, गणेश भदे,  मोहन तांबडे, आकाश साबळे, योगेश गावंडे, सुधीर साबे, आशिष बचे, ऋषी चो पडे आदींसह शेकडो समाजबांधव उपस्थित होते. 

Web Title: Attack on Nagpur Legislative Assembly on Monday for attack on Dhangar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.