अज्ञात मारेकऱ्यांचा घरावर हल्ला; वाहनांची तोडफोड अन दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 12:57 PM2019-02-04T12:57:57+5:302019-02-04T12:58:48+5:30

अकोला : सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्याचे हद्दीतील न्यू तापडिया नगरमध्ये असलेल्या प्रथमेश नगरातील एका घरावर अज्ञात मारेकऱ्यांनी हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री उशिरा घडली.

Attack on house by unknown assailants; vehicles vandilised | अज्ञात मारेकऱ्यांचा घरावर हल्ला; वाहनांची तोडफोड अन दगडफेक

अज्ञात मारेकऱ्यांचा घरावर हल्ला; वाहनांची तोडफोड अन दगडफेक

Next

अकोला : सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्याचे हद्दीतील न्यू तापडिया नगरमध्ये असलेल्या प्रथमेश नगरातील एका घरावर अज्ञात मारेकऱ्यांनी हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री उशिरा घडली. घरासमोर उभ्या असलेल्या कारवरही मोठे दगड फेकण्यात आले. त्यामुळे कारच्या काचा फुटल्या असून या कारमधील 4 लाखांची रोकड मारेकऱ्यांनी पळविल्याची माहिती आहे. 

न्यू तापडिया नगरातील प्रथमेश नगरमध्ये हेमंत बघिरथ मिश्रा हे रहिवासी असून ते एक खासगी एजनिसिद्वारे बँकांची थकीत वसुलीचे कामकाज करीत असल्याची माहिती समोर आली आहे.  ते रविवारी कामावरून परत आल्यानंतर वसुलीचे 4 लाख रुपये कारमध्येच ठेऊन घरात गेले. बाहेरील गेटला कुलूप लावून ते घरामध्ये गेल्यानंतर 3 अज्ञात मारेकऱ्यांनि त्यांच्या
घरासमोर उभ्या असलेल्या महागड्या वाहनांवर दगडफेक करून त्याच्या काचा फोडल्या. तर सदर घरावरही दगडफेक करण्यात आली. रविवारी रात्री अकरा वाजेच्या दरम्यान अज्ञात मारेकऱ्यांनी सदर घरावर दगडफेक करून हल्ला चढवल्याची माहिती सिव्हिल लाइन्स पोलिसांनी दिली. यामध्ये घरातील काही जण जखमी झाल्याची माहिती असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाईन्स पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. सदर दगडफेक आणि तोडफोडीचे कारण अद्याप समोर आले नसून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सुरू केला आहे. यासोबतच दगडफेक आणि तोडफोड करणाऱ्यांची माहिती समोर पोलिसांनी घेण्यासाठी तपस सुरू केला असून सदर तिन्ही आरोपी सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्याची माहिती आहे.

हल्लेखोर जिल्ह्यातून तडीपार
हेमंत मिश्रा यांच्या निवासस्थानी दगडफेक करीत हल्ला करणाऱ्या तीन आरोपींमधील 2 आरोपी जिल्ह्यातुन तडीपार असल्याची माहिती आहे. हे आरोपी सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्याने त्यांची चेहरे पोलिसांसमोर आले असून कुख्यात आरोपी असल्याचे पोलिसांचे म्हणे आहे.

Web Title: Attack on house by unknown assailants; vehicles vandilised

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.