Akola: Passengers of Bhusaval-Nagpur passenger will not run today! | अकोला : आज धावणार नाही भुसावळ-नागपूर पॅसेंजर!

ठळक मुद्देमध्य रेल्वेने दिले वेळापत्रकफेब्रुवारी-18 पर्यंत ठरावीक दिवशी राहणार बंद

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात रेल्वे मार्गाच्या दुरूस्तीचे काम प्रगतीपथावर आहे. याच कारणास्तव अकोला मार्गे नियमित धावणारी ५१२८५/५१२६६ भुसावळ-नागपूर-भुसावळ पॅसेंजर ही गाडी १३ डिसेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे.

नागपूर विभागात रेल्वे मार्गाचे अद्यावतीकरण सुरू आहे. याच कारणास्तव अकोला मार्गे नियमित धावणारी ५१२८५/५१२६६ भुसावळ-नागपूर-भुसावळ ही पॅसेंजर १३ डिसेंबर ते २८ फेब्रुवारी-२0१८ या कालावधीत ठराविक दिवशी बंद ठेवण्याचा निर्ण रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. याबाबत मध्य रेल्वे प्रशासनाने नवीन वेळापत्रक जारी केले असून, त्यानुसार ही पॅसेंजर १३, १७, २0, २२, २४, २७, ३१ डिसेंबर रोजी, तसेच ३, ७, १0, १२, १४, १७, १९, २१, २४, २६, २८, ३१ जानेवारी-१८ रोजी व २, ४, ७, ९, ११, १४, १६, १८, २१, २५, २८ फेब्रुवारी-१८ या ठराविक तारखांना या गाडीच्या अप आणि डाऊन मार्गावरील फेर्‍या रद्द राहणार आहे. याबाबत भुसावळ ते नागपूर दरम्यान असलेल्या सर्व लहान व मोठय़ रेल्वे स्थानकांना मध्य रेल्वे प्रशासनाने मंगळवारी रात्री सूचना दिल्या. याच कारणास्तव गेल्या दिवाळीत व त्यानंतर काही ठराविक दिवशी या गाडीला विश्रांती देण्यात आली होती.