अकोला : १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लादले मातृत्व; गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 01:29 AM2018-01-11T01:29:08+5:302018-01-11T01:30:13+5:30

अकोला : १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादणार्‍या युवकाविरुद्ध सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी युवक वाशिम येथील असून, तो अकोल्यात शिक्षण घेण्यासाठी आला आहे. चेतन किशोर लहाने असे आरोपीचे नाव आहे. 

Akola: Motherhood imposed on a 17 year old girl; Filed the complaint | अकोला : १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लादले मातृत्व; गुन्हा दाखल 

अकोला : १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लादले मातृत्व; गुन्हा दाखल 

Next
ठळक मुद्देयुवकाविरुद्ध सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल चेतन किशोर लहाने असे आरोपीचे नाव 

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादणार्‍या युवकाविरुद्ध सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी युवक वाशिम येथील असून, तो अकोल्यात शिक्षण घेण्यासाठी आला आहे. चेतन किशोर लहाने असे आरोपीचे नाव आहे. 
चेतन हा अकोल्यात पॉलिटेक्निकचे शिक्षण घेण्यासाठी आला आहे. तो जवाहर नगरमध्ये भाड्याने खोली करून राहत होता. यावेळी त्याची ओळख गीता नगरमध्ये राहणार्‍या इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या एका मुलीसोबत झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर त्याने  ऑक्टोबर २0१६ पासून त्याच्या खोलीवरच त्या मुलीवर सतत बलात्कार केला. त्यातून मुलगी गर्भवती राहिली. मुलीची प्रसूतीची वेळ जवळ आल्याने तिला वेदना झाल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तिला मंगळवारी सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. तेथे तिने एका बाळाला जन्म दिला. कुमारीमाता असल्याने या घटनेची नोंद सिव्हिल लाइन्स पोलिसांनी केल्यानंतर जुने शहर पोलिसांकडे प्रकरण वर्ग करण्यात आले. मुलीचे बयाण घेतल्यानंतर या मुलीवर वाशिम येथील युवकाने सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीत बलात्कार केल्याचे समोर आले. त्यामुळे सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात वाशिम येथील युवकाविरुद्ध बलात्कार व लहान मुलांचे लैंगिक शोषण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिव्हिल लाइन्स पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. 

Web Title: Akola: Motherhood imposed on a 17 year old girl; Filed the complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.