अकोला : वाडेगाव येथील महात्मा फुले पतसंस्थेतील घोटाळ्य़ावर शिक्कामोर्तब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 01:25 AM2018-02-27T01:25:21+5:302018-02-27T01:25:21+5:30

Akola: The mausoleum in Mahatma Phule Credit Society at Wadegaon | अकोला : वाडेगाव येथील महात्मा फुले पतसंस्थेतील घोटाळ्य़ावर शिक्कामोर्तब

अकोला : वाडेगाव येथील महात्मा फुले पतसंस्थेतील घोटाळ्य़ावर शिक्कामोर्तब

googlenewsNext
ठळक मुद्देचौकशी अहवाल संचालक, व्यवस्थापक, गोदामपालाकडून फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : वाडेगाव येथील महात्मा फुले बिगरशेती ग्रामीण सहकारी पतसंस्था संचालक, व्यवस्थापक, गोदामपालाकडून ५0 लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे सहकार विभागाच्या तालुका उपनिबंधकांनी केलेल्या चौकशीत उघड झाले आहे. त्यानुसार कारवाई करण्याची मागणी माजी संचालक मनोहर सोनटक्के यांनी केली आहे. 
महात्मा फुले पतसंस्थेत गैरव्यवहार झाल्याची तक्रार करत त्याची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी सोनटक्के यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली. त्यानुसार पतसंस्थेची चौकशी बाळापूरच्या तालुका उपनिबंधकांकडे सोपवण्यात आली. त्यांनी केलेल्या चौकशीचा अहवाल १८ जानेवारी २0१८ रोजी जिल्हा उपनिबंधकांना सादर केला. त्यामध्ये पतसंस्थेचे संचालक, व्यवस्थापक, गोदामपालांनी हा गैरव्यवहार केला आहे. या प्रकरणात गुन्हे दाखल असून, न्यायप्रविष्ट आहे. संबंधितांवर जबाबदारी निश्‍चित झाली आहे. त्यांच्याकडून वसुली झाल्याशिवाय तक्रारकर्त्याच्या शेतमालाबाबत निर्णय घेता येणार नाही, असेही नमूद करण्यात आले आहे. 
अहवालात संस्थेची फसवणूक करण्यासाठी गोदामपाल, व्यवस्थापक आणि संचालकांनी काही शेतकर्‍यांचे सात-बारा न घेताच कर्जवाटप केल्याचे दाखवले आहे. ज्यांच्या नावाने कर्ज वाटप केले, त्यामध्ये अंकुश दत्तू शहाणे-८५000, प्रकाश मारोती कचाले-१५५0२५, राजाभाऊ भीमराव काळे-५२0२५, आनंदराव काशिराम उजाडे- २१५000, ज्ञानेश्‍वर काशिनाथ म्हैसने- ८0000, १२५000, १२८0२५, १५00२५, किशोर हरिचंद्र इंगोले- ९५0२५, संजय विश्राम साबळे-६८0२५, १३५0२५, महादेव अघडते-८00२५, मुरलीधर नामदेव ढेंगे- १000२५, ५५0२५, रमेश पांडुरंग गोतमारे- ६२0२५, दिलीप गुलाब लाहोळे-५५0२५, प्रकाश प्रल्हाद लांडे- ६५0२५, ५४000, सुनील मानकर- ८00२५, ९६000, ९६000, वाघ-२४0000, ११२१३५, सुखदेव बावणे- ६0000, ४00२५, गजानन श्यामराव जुमळे-१८५000, ७0९२५, चिंतामण परसैय्या-१४00२५, किशोर कळंब- ७२000, गजानन कराळे- ४८000, नारायण बावणे-१३९१३५, प्रल्हाद भटकर- ७२५00, ८000, विद्याधर काळे-११७000, ७५000, राजाराम वाडकर-१७0000, संतोष हरिभाऊ रहाटे-९0000, मदन भास्कर जठाळ-९0000, प्रमोद मधुकर लांडे-२४00२५ एवढय़ा रकमेचा समावेश आहे. 
त्याचवेळी ११ कर्जदारांनी कर्जाची मागणी केली. त्यांच्या लाखो रुपये कर्जाची उचल एस.पी. बारबुदे नामक एकाच व्यक्तीने केली. त्यालाही व्यवस्थापकाने अटकाव केला नाही. त्याशिवाय, १0 व्यक्तींनी कोणत्या वाहनाने धान्य गोदामात आणले, त्या पावतीची शहानिशा न करताच त्यांना व्यवस्थापकाने कर्जवाटप केले. या प्रकरणात गोदामपाल विजय साबळे, राजेश म्हैसने यांनी व्यापारी संतोष बारबुदे याच्याशी संगनमत करून हा प्रकार केला. त्याला व्यवस्थापक, संचालक मंडळ जबाबदार नसल्याचे हास्यास्पद प्रतिज्ञापत्र एक रुपयाच्या महसुली तिकिटावर दिले, हे विशेष. 

तक्रारीतील मुद्यानुसार चौकशी करण्यासाठी बाळापूर तालुका उपनिबंधकांना जबाबदारी दिली होती. त्यांचा चौकशी अहवाल प्राप्त झाला. संस्थेचे कार्यक्षेत्र बाळापूर तालुका असल्याने त्यातील मुद्यांनुसार कायदेशीर कारवाई करण्याचे पत्र तालुका उपनिबंधकांना देण्यात आले. 
- जी.जी. मावळे, 
जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था. 

Web Title: Akola: The mausoleum in Mahatma Phule Credit Society at Wadegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.