अकोला : चौथ्या राष्ट्रीय डयुबॉल स्पर्धेचे उद्घाटन; महाराष्ट्राने आसामला  ७-१ ने केले पराभूत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 08:06 PM2018-01-28T20:06:59+5:302018-01-28T20:14:40+5:30

अकोला : हॅण्डबॉल आणि रग्बी खेळासारखा खेळल्या जाणारा डयुबॉल  खेळाची प्रथमच अकोला येथे राष्ट्रीय पातळीची स्पर्धा आयोजित केली आहे.  संगीतकार वसंत देसाई क्रीडांगण येथे रविवारी चौथ्या राष्ट्रीय (१९ वर्षाआ तील मुले-मुली) डयुबॉल स्पर्धेचे उद्घाटन झाले. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी  महाराष्ट्र संघाचा सामना आसाम संघासोबत झाला. महाराष्ट्र संघातील  खेळाडूंनी अतिशय सुंदर खेळप्रदर्शन करीत ७-१ असा विजय मिळविला.

Akola: Inauguration of Fourth National duoball competition; Maharashtra defeated Assam 7-1! | अकोला : चौथ्या राष्ट्रीय डयुबॉल स्पर्धेचे उद्घाटन; महाराष्ट्राने आसामला  ७-१ ने केले पराभूत!

अकोला : चौथ्या राष्ट्रीय डयुबॉल स्पर्धेचे उद्घाटन; महाराष्ट्राने आसामला  ७-१ ने केले पराभूत!

Next
ठळक मुद्देराष्ट्रीय पातळीवरील डयुबॉल स्पर्धेचे प्रथमच अकोला आयोजन

नीलिमा शिंगणे-जगड
अकोला : हॅण्डबॉल आणि रग्बी खेळासारखा खेळल्या जाणारा डयुबॉल  खेळाची प्रथमच अकोला येथे राष्ट्रीय पातळीची स्पर्धा आयोजित केली आहे.  संगीतकार वसंत देसाई क्रीडांगण येथे रविवारी चौथ्या राष्ट्रीय (१९ वर्षाआ तील मुले-मुली) डयुबॉल स्पर्धेचे उद्घाटन झाले. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी  महाराष्ट्र संघाचा सामना आसाम संघासोबत झाला. महाराष्ट्र संघातील  खेळाडूंनी अतिशय सुंदर खेळप्रदर्शन करीत ७-१ असा विजय मिळविला.  मुलींच्या गटातील सामन्यात महाराष्ट्राला कर्नाटककडून 0-१ ने पराभव  स्वीकारावा लागला.
मुलांच्या गटात दिल्ली, कर्नाटक, बिहार, आंध्र प्रदेश आणि गोवा संघाने आ पल्या प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळविला. सकाळच्या सत्रात मुलींच्या गटा तील पहिला सामना दिल्ली व राजस्थान संघात झाला. दिल्लीच्या समीक्षाने दोन  गोल नोंदवित संघाला विजय मिळवून दिला. दुसरा सामना कर्नाटक व  महाराष्ट्र संघात झाला. कर्नाटकच्या श्रुतीने एक गोल करू न संघाला आघाडी  मिळवून दिली. सामन्याच्या अंतिम क्षणापर्यंत आघाडी कायम ठेवण्यात  कर्नाटक संघाला यश मिळाले. महाराष्ट्राला या सामन्यात पराभवाचे तोंड  पाहावे लागले.
मुलांच्या गटात पहिला सामना बिहार व मध्य प्रदेश संघात झाला. बिहारने  एकतर्फी ४-१ असा विजय मिळविला. बिहारच्या मोनू निगम, पवन कुमार  यांनी प्रत्येकी दोन, तसेच मध्य प्रदेशच्या शिव राणा याने एक गोल केला. दुसरा  सामना आंध्र प्रदेश आणि तेलंगणा संघात होऊन आंध्र प्रदेशने ३-१ ने सामना  जिंकला. आंध्र प्रदेशचा जी. किरण याने दोन, जुनेद व तिवारी यांनी प्रत्येकी  एक गोल केला. तिसरा सामना गत राष्ट्रीय विजेता संघ गोवा व राजस्थान  संघात झाला. गोव्याचा इब्राहिम शेख याने तीन आणि उल्पात शेट याने दोन  गोल करू न सामन्यावर सहज विजय मिळविला. चौथा सामना महाराष्ट्र आणि  आसाम संघात खेळला गेला. महाराष्ट्र संघाने उत्कृष्ट खेळप्रदर्शन केले.  रोशन चंदनखेडे चार, प्रज्वल मुळे दोन आणि यश काटे याने एक गोल करू न  आसामचा धुव्वा उडविला. आसामच्या प्रसन्नाला एक गोल करण्यास यश  मिळाले. स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी खेळल्या गेलेल्या प्रदर्शनी  सामन्यात महाराष्ट्र संघाला गोवा संघाने १-३ अशा गुणांनी पराभूत केले.

 

Web Title: Akola: Inauguration of Fourth National duoball competition; Maharashtra defeated Assam 7-1!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.