हॅण्डबॉल स्पर्धेत विद्यार्थी चमकले

By admin | Published: September 3, 2015 12:27 AM2015-09-03T00:27:19+5:302015-09-03T00:27:19+5:30

क्रीडा व युवक सेवा संचालनालय तथा जिल्हा क्रिडा परिषद व जिल्हा क्रिडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय हॅण्डबॉल क्रिडा स्पर्धा पार पडली.

Students compete in handball competition | हॅण्डबॉल स्पर्धेत विद्यार्थी चमकले

हॅण्डबॉल स्पर्धेत विद्यार्थी चमकले

Next


भंडारा : क्रीडा व युवक सेवा संचालनालय तथा जिल्हा क्रिडा परिषद व जिल्हा क्रिडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय हॅण्डबॉल क्रिडा स्पर्धा पार पडली. १४ वर्ष वयोगटामध्ये स्प्रिंग डेल स्कूल व नुतन कन्या शाळा, १७ वर्षे वयोगटामध्ये सैनिक स्कुल लाखनी व स्प्रिंग डेल स्कूल, १९ वर्षे वयोगटामध्ये जेसिस कॉन्व्हेंट व नुतन कन्या शाळांचे संघ विजयी झाले. या विजयी संघांना विभागीय स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.
या स्पर्धेमध्ये १४ वर्ष मुलेमुली वयोगटात १० संघ, १७ वर्ष मुलेमुली वयोगटात १२ संघ तर १९ वर्ष मुलेमुली वयोगटात सहा संघ असे एकूण २८ संघाचा समावेश होता. १४ वर्ष मुलांच्या वयोगटामध्ये अंतिम सामना स्प्रिंग डेल स्कुलविरुध्द जेसिस कॉन्व्हेंट यांच्यामध्ये झाला. त्यात स्प्रिंग डेल स्कुलचे निवृत्तीनाथ नागरीकर, यश पांडे, चैतन्य यांनी गोल मारले. जेसिस कॉन्हेंटचे अजिंक्य गजभिये, अनुराग बेंदेवार यांनी गोल मारले. या सामन्यामध्ये स्प्रिंग डेल स्कुलने ५-२ असा विजय संपादन केला. १४ वर्ष मुलीच्या वयोगटातील अंतिम सामना नुतन कन्या शाळा विरुध्द स्प्रिंग डेल स्कुल यांच्यात झाला. त्यामध्ये नुतन कन्या शाळेच्या कल्याणी करवाडे, अनुष्का येळणे, दीक्षा पचारे यांनी गोल मारुन १०-० ने विजय संपादन केला.
१७ वर्ष मुलांच्या वयोगटामध्ये अंतिम सामना समर्थ विद्यालय लाखनी विरुध्द सैनिक स्कुल लाखनी यांच्यात झाला. त्यामध्ये सैनिक स्कुल लाखनीच्या पवन येल्ले, आयष मसराम, अभिषेक गंदेवार, अमोल कोकाडे, रोहीत किरसाने याने १३ गोल मारले. समर्थ विद्यालय लाखनीच्या माधव वंजारी, मोझीम सिद्दिकी यांनी तीन गोल मारले. त्यामध्ये सैनिक स्कुल लाखनीचा संघ १३-३ ने विजयी झाला. १७ वर्ष मुलीच्या वयोगटामध्ये अंतिम सामना सनिज स्प्रिंग डेल स्कुलविरुध्द जेसिस कॉन्व्हेंट यांच्यात झाला. त्यामध्ये सनिज स्प्रिंग डेल स्कुलच्या गौरी खोटेले, श्रेया घोल्लर यांनी १० गोल मारुन १०-० ने विजय मिळविला. १९ वर्ष मुलांच्या वयोगटामध्ये अंतिम सामना जेसिस कॉन्व्हेंटविरुध्द जिल्हा परिषद गांधी विद्यालय, लाखनी यांच्यात झाला. त्यामध्ये जेसिस कॉन्व्हेंटच्या सुशृत चाचेरकर, अमन येल, उषभ साखरवाडे, असे १० गोल मारले. जिल्हा परिषद गांधी विद्यालय लाखनीच्या प्रज्वल सेलोकर, गौरव धोंडे, सुबोध बडोले असे चार गोल मारले. यामध्ये जेसिस कॉन्व्हेंटच्या संघ १०-४ ने विजयी झाला. १९ वर्ष मुलीच्या वयोगटामध्ये अंतिम सामना ग्रामविकास कनिष्ठ महाविद्यालय कोंढी विरुध्द नुतन कन्या शाळा भंडारा यांच्यात झाला. त्यामध्ये नुतन कन्या शाळेच्या निकीता जांभुळकर, कांचन खेताडे, पायल भोडे यांनी सहा गोल मारुन ६-० ने विजय संपादन केला. विजयी संघांना नागपूर विभागस्तरीय क्रिडा स्पर्धेकरीता जिल्हा क्रिडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार यांनी शुभेच्छा दिल्या. सामन्यांचे पंच म्हणून हेमंत धुमनखेडे, राहुल पाठक, जितेश राठोड, लोकेश राऊत, अरबाज खान, तौसिक खान, ऋषिकेश आंबेकर, सुमेश शेंडे यांनी काम पाहिले. स्पधेचे आयोजन क्रिडा अधिकारी त्रिवेणी बांते, मनोज पंधराम, रत्नमाला गायधने यांनी केले. मैदान सुव्यवस्थित ठेवण्यासाठी राजु मडावी, लिलाधर भेदे, तुषार नागदेवे, सौरभ भेदे यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Students compete in handball competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.