अकोल्यात ‘तीन तलाक’ विधेयक विरोधात ‘एल्गार’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 01:45 AM2018-01-20T01:45:28+5:302018-01-20T01:46:25+5:30

अकोला : लोकसभेत मंजूर करण्यात आलेल्या ‘तीन तलाक’ विधेयक विरोधात ‘एल्गार’ पुकारत सुन्नी युवक आघाडी, सुन्नी बैतुलमाल-दारुकलजा, केजीएन महिला गट व अहल-ए-सुन्नत उल जमात संघटनेच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मूक मोर्चा काढण्यात आला.

Akola: 'Elgar' against 'Three Divorce' Bill! | अकोल्यात ‘तीन तलाक’ विधेयक विरोधात ‘एल्गार’!

अकोल्यात ‘तीन तलाक’ विधेयक विरोधात ‘एल्गार’!

Next
ठळक मुद्देसुन्नी युवक आघाडीने काढला जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘मूक मोर्चा ’

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : लोकसभेत मंजूर करण्यात आलेल्या ‘तीन तलाक’ विधेयक विरोधात ‘एल्गार’ पुकारत सुन्नी युवक आघाडी, सुन्नी बैतुलमाल-दारुकलजा, केजीएन महिला गट व अहल-ए-सुन्नत उल जमात संघटनेच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मूक मोर्चा काढण्यात आला. तीन तलाक विधेयक रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांमार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान, महिला आयोग व मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले.
लोकसभेत पारित करण्यात आलेल्या ‘तीन तलाक’  विधेयकाला विरोध करीत, तीन तलाव विधेयक रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी अकोला शहरातील सुन्नी युवक आघाडी, सुन्नी बैतुलमाल दारुकलजा, केजीएन महिला गट व अहल ए-सुन्नत उल जमात इत्यादी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने धडक मूक मोर्चा काढण्यात आला. 
शहरातील जुने वाशिम स्टॅन्डस्थित फतेह चौकातून काढण्यात आलेला मोर्चा खुले नाट्यगृह चौक, पंचायत समितीसमोरून मार्गक्रमण करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचला. तीन तलाक विधेयक रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्यामार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान, महिला आयोग व मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले. मूक मोर्चात सहभागी महिला-पुरुषांच्या हातात तीन तलाक विधेयकाला विरोध दर्शविणारे फलक होते. 
मुफ्ती-ए-बरार मुफ्ती अब्दुल रशीद कारंजवी -रिजवी यांच्या मार्गदर्शनात आणि जहीर-उल-इस्लाम (जकी मिया) यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या मोर्चात सुन्नी युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शाहीद इकबाल रिजवी, महानगराध्यक्ष नासीर खान, मोहम्मद साकीब ऊर्फ गुड्ड मेमन, इम्रान चौहान, जुनेद खान, हाजी शमस तबरेज सिब्तेनी, सुन्नी युवक आघाडी महिला आघाडी अध्यक्ष आलेमा आमेना कौसर, आलेमा शिरीन फातिमा, आलेमा हुमा कौसर, आलेमा फिरदोस, आलेमा गुलनाज परवीन, यासमीन कपाडिया, मुफ्ती आरीफ, मौलाना गलाम मुस्तफा, हाफीजोकारी मसूद अहमद, मुफ्ती गुफरान गाजी, मौलाना सय्यद शाहनवाज, मौलाना आसीफराज, सय्यद गुलाम रसूल, मुफ्ती इस्माईल, मौलाना सुलतान रजा, हाफीज मुशर्रफ, हाफीज इब्राहिम, हाफीज अफसर, हाफीज अयूब, मौलाना रियाज, मौलाना अतीक, हाफीज नजीर, मौलाना युनुस, मौलाना सलीम, हाजी फारुक , हाजी अयुब रब्बानी, हसन इनामदार, आफताब खान, वसीम जमाली, मोहंमद फैजान, तौसीफ कादरी, इरशाद अहमद, वसीम अत्तारी, हाजी मेहमूद खान, एजाज पहेलवान, आरीफ खान, मेहबूब खान, मोहम्मद अनीस नुरी, अब्दुल करीम जानी, शेख युसुफ असलम खान, जावेद जकारिया, गुलाम यासीन बचाव, शकूर खान लोधी, नसीम पुजानी, अँड,नजीब शेख, अँड.एम.बदर, अँड.युसुफ नौरंगाबादी, अँड.मोबीन यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

महिलांचा लक्षणीय सहभाग!
‘तीन तलाक’ विधेयक विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मूक मोर्चात बुरखा घातलेल्या महिलांचा सहभाग लक्षणीय होता. मोर्चात सहभागी बुरखा घातलेल्या महिलांपैकी अनेक महिलांनी पहिल्यांदाच जिल्हाधिकारी कार्यालय पाहिले.

Web Title: Akola: 'Elgar' against 'Three Divorce' Bill!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.