अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केले वॉटर कप स्पर्धेत श्रमदान

By atul.jaiswal | Published: April 13, 2018 06:33 PM2018-04-13T18:33:43+5:302018-04-13T18:33:43+5:30

अकोला : वॉटरकप स्पर्धेत सहभागी लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी करी रूपागड या गावाला १२ एप्रिल रोजी सांयकाळी ७ वाजता भेट देवून सलग समतल चराच्या कामात गावक-यांसोबत स्वत: श्रमदान केले

Akola District Collector Shramdan in the Water Cup | अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केले वॉटर कप स्पर्धेत श्रमदान

अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केले वॉटर कप स्पर्धेत श्रमदान

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकारी पांडेय यांनी वॉटरकप स्पर्धेत भाग घेण्यासाठी गावात चालु असलेल्या कामाची पाहणी केली.लोकांसोबत स्वत: टिकास व फावडे घेऊन काम करून लोकांचे मनोबल वाढविले.गावातील अंतर्गत रस्ते तसेच पोहोच रस्ते व पाणी पुरवठयाची अडचणी जाणून घेवून त्याबाबत संबंधीतांना सुचना दिल्या.

अकोला : दुष्काळावर मात करण्यासाठी व गाव पाणीदार बनविण्यासाठी पाणी फाउंडेशन या संस्थेकडून सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत तेल्हारा तालुक्यातील करी रूपागड या गावाने भाग घेतला आहे. या गावातील वॉटरकप स्पर्धेत सहभागी लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी करी रूपागड या गावाला १२ एप्रिल रोजी सांयकाळी ७ वाजता भेट देवून सलग समतल चराच्या कामात गावक-यांसोबत स्वत: श्रमदान केले व गावकºयांचा उत्साह वाढविला.
यावेळी अकोट विभागाचे उपविभागीय अधिकारी उदय राजपूत तेल्हाराचे तहसिलदार यावलीकर, उपविभागीय कृषी अधिकारी कंडारकर, गटविकास अधिकारी राजीव फडके , कृषी अधिकरी मेश्राम , हिवरखेडचे पोलीस निरीक्षक देवरे, पाणी फाउंडेशनचे समन्वयक नरेंद्र काकड, तालुका समन्वयक प्रशांत गायगोळ यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी पांडेय यांनी वॉटरकप स्पर्धेत भाग घेण्यासाठी गावात चालु असलेल्या कामाची पाहणी केली. गावकरी गावातील शिवारातील पाणी शिवारात अडविण्यासाठी सलग समतल चर तयार करत आहेत. या कामात जिल्हाधिकारी यांनी लोकांसोबत स्वत: टिकास व फावडे घेऊन काम करून लोकांचे मनोबल वाढविले. त्यानंतर जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी गावकºयांशी संवाद साधला. गावातील समस्या व अडचणी जाणून घेतल्या. गावातील अंतर्गत रस्ते तसेच पोहोच रस्ते व पाणी पुरवठयाची अडचणी जाणून घेवून त्याबाबत संबंधीतांना सुचना दिल्या.

जॉबकार्डधारकांना १८० रुपये रोज
पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेमध्ये भाग घेणाºया गावातील ज्यांच्याकडे जॉबकार्ड आहेत. अशा लोकांना नरेगातंर्गत दररोज १८० मोबदला देण्यात यावा. अशा सुचना त्यांनी यावेळी दिल्या.

Web Title: Akola District Collector Shramdan in the Water Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.