अकोला महापालिकेतील १६० कामचुकार कर्मचाऱ्यांना दणका; वेतनवाढ रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 12:14 PM2019-06-19T12:14:04+5:302019-06-19T12:14:13+5:30

महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी जलप्रदाय व मालमत्ता कर विभागातील तब्बल १६० कर्मचाºयांना दणका देत अनेकांची वेतनवाढ रद्द करण्याची कारवाई केली.

Akola corporation's 160 workers Salary hike canceled | अकोला महापालिकेतील १६० कामचुकार कर्मचाऱ्यांना दणका; वेतनवाढ रद्द

अकोला महापालिकेतील १६० कामचुकार कर्मचाऱ्यांना दणका; वेतनवाढ रद्द

Next


अकोला: कोट्यवधींच्या मालमत्ता कर वसुलीकडे दुर्लक्ष करणे, गळती लागलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीला ठेंगा दाखवण्यासोबतच अवैध नळ कनेक्शन शोध मोहीम परस्पर बंद करणे, पाणीपट्टी वसुलीकडे पाठ फिरवण्याची बाब गांभीर्याने घेत मंगळवारी महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी जलप्रदाय व मालमत्ता कर विभागातील तब्बल १६० कर्मचाºयांना दणका देत अनेकांची वेतनवाढ रद्द करण्याची कारवाई केली. यामध्ये टॅक्स विभागाचे कर अधीक्षक, चारही सहायक कर अधीक्षकांसह जलप्रदाय विभागातील उपअभियंत्यांचाही समावेश आहे. यादरम्यान, कर वसुली लिपिक गणेश चव्हाण यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा आदेश आयुक्तांनी जारी केला.
महापालिकेचा प्रशासकीय कारभार रसातळाला गेल्याचे चित्र आहे. प्रशासनाने मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन केल्यानंतर अवघ्या १६ कोटींच्या उत्पन्नाने ७० कोटींचा पल्ला गाठला. कर विभागातील वसुली लिपिकांनी प्रामाणिकपणे टॅक्सची वसुली केल्यास मनपा कर्मचाºयांच्या थकीत वेतनाची समस्या निर्माणच होणार नाही, अशी परिस्थिती असताना २०१८-१९ मधील ४५ कोटी आणि चालू आर्थिक वर्षातील ७० कोटी अशी एकूण ११५ कोटींची थकबाकी आहे. या वसुली लिपिकांवर कर अधीक्षक विजय पारतवार, चारही सहायक कर अधीक्षकांचे नियंत्रण नसल्यामुळे कर वसुली ठप्प असल्याचा ठपका ठेवत मंगळवारी महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी संबंधितांसह ४२ वसुली लिपिकांवर वेतनवाढ रोखण्याची कारवाई केली. यासोबतच जलप्रदाय विभागातील कामकाजाची झाडाझडती घेतली असता, मानधनावरील उपअभियंता एच.जी. ताठे यांच्यासह कंत्राटी कनिष्ठ अभियंता, फिटर, व्हॉल्व्हमन अशा ११५ कर्मचाºयांवर वेतनवाढ रोखण्याचा बडगा उगारला.

गोपनीय दस्तावेज सार्वजनिक करणे भोवले
सोशल मीडियावर मनपाचे गोपनीय दस्तावेज सार्वजनिक केल्याप्रकरणी उपायुक्त विजयकुमार म्हसाळ यांचे स्वीय सहायक संजय कथले यांची तीन वेतनवाढ तसेच नगरसचिव विभागातील प्रमुख सहायक किशोर सोनटक्के यांची दोन वेतनवाढ रोखण्याची कारवाई केली. यादरम्यान, लेखा विभागातील प्रमुख सहायक देवीदास निकाळजे यांची पश्चिम झोन कार्यालयात सहा. कर अधीक्षक पदी बदली करण्याचे निर्देश दिले.
सभापतींचा दरबार भोवला
मालमत्तांचे हस्तांतरण व खुल्या भूखंडांच्या नोंदीसाठी नागरिकांना झुलवत ठेवणाºया मालमत्ता कर विभागाची १७ जून रोजी मनपाचे स्थायी समिती सभापती विनोद मापारी यांनी चांगलीच शाळा घेतली होती. नागरिकांच्या तक्रारी पाहता या विभागातील कर्मचाºयांच्या कार्यशैलीवर विनोद मापारी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. हा दरबार कर विभागाच्या अंगलट आल्याची चर्चा आहे.


मनपाच्या इतिहासात पहिल्यांदाच मोठी कारवाई
मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी मंगळवारी जलप्रदाय व टॅक्स विभागाची झाडाझडती घेतली. कर वसुलीकडे पाठ फिरवणे, अवैध नळ कनेक्शन शोध मोहीम बंद करून पाणीपट्टी वसुली ठप्प पाडणे, गळती लागलेल्या जलवाहिन्यांकडे दुर्लक्ष करणे आदी प्रकार त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी संबंधित कर्मचाºयांवर कारवाईचा बडगा उगारला. मनपाच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

कर वसुली लिपिकाने नेमकी किती टक्के वसुली केली, त्यानुसार संबंधितांची वेतनवाढ रोखण्यात येऊन काहींच्या वेतनातून रक्कम जमा करण्याचा आदेश दिला आहे. जशी जबाबदारी, तशी कारवाई केली असून, यापुढे जलप्रदाय व कर विभागाच्या कामकाजात सुधारणा होईल, अशी अपेक्षा आहे.
- संजय कापडणीस आयुक्त, मनपा

 

Web Title: Akola corporation's 160 workers Salary hike canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.