अकोला : मोर्णा नदीकाठी होणार ‘सहकार घाट’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 02:06 AM2018-02-03T02:06:08+5:302018-02-03T02:06:30+5:30

अकोला :  ‘मोर्णा स्वच्छता मिशन’ अंतर्गत लोकसहभागातून मोर्णा नदी स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये स्वच्छ करण्यात आलेल्या निमवाडी परिसरातील मोर्णा नदीकाठी ‘सहकार घाट’ बांधण्यात येणार असून, सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते शुक्रवारी ‘सहकार घाटा’चे भूमिपूजन करण्यात आले.

Akola: 'Cooper Ghat' will be done by Mourna river! | अकोला : मोर्णा नदीकाठी होणार ‘सहकार घाट’!

अकोला : मोर्णा नदीकाठी होणार ‘सहकार घाट’!

Next
ठळक मुद्देसहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते शुक्रवारी ‘सहकार घाटा’चे भूमिपूजन करण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला :  ‘मोर्णा स्वच्छता मिशन’ अंतर्गत लोकसहभागातून मोर्णा नदी स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये स्वच्छ करण्यात आलेल्या निमवाडी परिसरातील मोर्णा नदीकाठी ‘सहकार घाट’ बांधण्यात येणार असून, सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते शुक्रवारी ‘सहकार घाटा’चे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार संजय धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, महापौर विजय अग्रवाल, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, उपविभागीय अधिकारी संजय खडसे उपस्थित होते. स्वच्छता मोहिमेनंतर नदीकाठावर लोकसहभागातून घाट बांधण्यात येणार असून, उद्यानांची निर्मिती करण्यात येणार आहे. स्वच्छ करण्यात आलेल्या निमवाडी परिसरातील मोर्णा नदीच्या काठावर ‘सहकार घाट’ बांधण्यात येणार आहे. या घाटाचे भूमिपूजन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

निधीसाठी प्रयत्न            करणार - पालकमंत्री 
मोर्णा स्वच्छता मिशन अभियानासंदर्भात केंद्रीय स्तरावर बैठक घेण्यात येणार असून, नमामी नदी योजनेंतर्गत केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची ग्वाही पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी यावेळी दिली. साबरमती नदी स्वच्छ मिशनच्या सनदी अधिकार्‍यांसोबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे पथक पाहणीसाठी लवकरच अहमदाबाद येथे पाठविण्यात येणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. 

आज स्वच्छता मोहीम
जिल्हा प्रशासन आणि विविध स्वयंसेवी संस्था व संघटनांच्यावतीने लोकसहभागातून शनिवार, ३ फेब्रुवारी रोजी मोर्णा नदी स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. लोकसहभागातून गत १३ जानेवारी रोजी मोर्णा नदी स्वच्छता मोहीम प्रारंभ करण्यात आली. त्यामध्ये चौथ्या टप्प्यातील मोर्णा स्वच्छता मोहीम ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजतापासून राबविण्यात येणार आहे.

आमदार शर्मा यांनी जाहीर केला १५ लाखांचा निधी
जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या प्रयत्नाने लोकचळवळ बनलेल्या मोर्णा स्वच्छता मिशनसाठी आजपयर्ंत हजारो लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. त्याचप्रमाणे नदीकाठी विविध विकास कामांसाठीही अनेक दात्यांकडून आर्थिक योगदान मिळत आहे. 
आमदार गोवर्धन शर्मा यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून मोर्णाच्या विकासासाठी रुपये १५ लाखांचा निधी जाहीर केला आहे. या निधीतून नदीकाठी घाटाची निर्मिती केली जाणार आहे. आमदार गोवर्धन शर्मा यांनी जाहीर केलेल्या रुपये  १५ लाखांच्या निधीतून मोर्णा काठी घाट निर्मितीचे काम केले जाणार आहे.

Web Title: Akola: 'Cooper Ghat' will be done by Mourna river!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.