अकोला : महिलेचा जळालेल्या अवस्थेत आढळला मृतदेह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 11:42 PM2017-12-18T23:42:26+5:302017-12-18T23:47:13+5:30

रायली जीन परिसरातील दगडी पुलानजीक एका ६५ वर्षीय महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. या महिलेच्या मृतदेहावरून संशय निर्माण करण्यात येत असून, रामदास पेठ पोलिसांनी आत्महत्या की हत्या, या दोन्ही दिशेने तपास सुरू केला आहे.

Akola: The bodies of the woman found dead! | अकोला : महिलेचा जळालेल्या अवस्थेत आढळला मृतदेह!

अकोला : महिलेचा जळालेल्या अवस्थेत आढळला मृतदेह!

googlenewsNext
ठळक मुद्देदगडी पुलानजीकची घटनाआत्महत्या की हत्या पोलिसांकडून शोध

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: रायली जीन परिसरातील दगडी पुलानजीक एका ६५ वर्षीय महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. या महिलेच्या मृतदेहावरून संशय निर्माण करण्यात येत असून, रामदास पेठ पोलिसांनी आत्महत्या की हत्या, या दोन्ही दिशेने तपास सुरू केला आहे.
दगडी पुलानजीक एका महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह पडलेला असल्याची माहिती रामदास पेठ पोलिसांना मिळाली, पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सवरेपचार रुग्णालयात पाठविला. जळालेल्या महिलेचे वय ६५ वर्षांच्या वर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सदर महिला उभी असताना जळाली असल्याचेही पोलिसांनी सांगितले असून, यामध्ये सध्यातरी घातपात नसल्याची माहिती आहे. सदर गंभीर प्रकरणाचा सखोल तपास केल्यानंतर तसेच उत्तरीय तपासणीचा अहवाल आल्यानंतरच आत्महत्या की हत्या, हे स्पष्ट होणार आहे.

जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या महिलेचे वय ६५ वर्षांच्या वर असून, तोंडात केवळ दोनच दात आहेत. प्राथमिक चौकशीत घातपाताचा संशय येत नसून, आत्महत्या असल्याचे दिसून येत आहे. मात्र, तरीही पोलिसांकडून चारही दिशेने तपास करण्यात येत आहे. लवकरच या प्रकरणाचा उलगडा होणार आहे.
- शैलेष सपकाळ
ठाणेदार, रामदास पेठ पोलीस स्टेशन

Web Title: Akola: The bodies of the woman found dead!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.