कृषी विद्यापीठात यावर्षी पाच दिवस चालणार कृषी प्रदर्शन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 02:30 PM2018-12-14T14:30:41+5:302018-12-14T14:30:50+5:30

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्यावतीने अकोल्यात राज्यस्तरीय कृषी (अ‍ॅग्रोटेक-२०१८) प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

Agricultural exhibition will be organized for five days at PDKV | कृषी विद्यापीठात यावर्षी पाच दिवस चालणार कृषी प्रदर्शन!

कृषी विद्यापीठात यावर्षी पाच दिवस चालणार कृषी प्रदर्शन!

googlenewsNext

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्यावतीने अकोल्यात राज्यस्तरीय कृषी (अ‍ॅग्रोटेक-२०१८) प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी तीन दिवसांऐवजी २७ ते ३१ डिसेंबरपर्यंत पाच दिवस प्रदर्शन राहणार आहे. प्रदर्शनाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येण्याची शक्यता आहे. यासाठी कृषी विद्यापीठाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ गुरुवारी मुंबईला रवाना झाले आहेत.
शेतकरी हाच केंद्रबिंदू मानून शेतीच्या दैनंदिन गरजा आणि शेतीच्या प्रश्नांची उकल होण्यासाठी भारताचे पहिले कृषी मंत्री डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्त अकोल्याच्या कृषी विद्यापीठाच्यावतीने शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील संशोधन, अद्ययावत तंत्रज्ञान शेतकºयांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत असते. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत कृषी विभाग, जिल्हा परिषद व संस्थांच्या सहकार्याने राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
नवनवीन संकल्पना आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर शेतीत करणे आता अनिवार्य असून, शेतकरीही हे तंत्रज्ञान अवगत करीत आहेत. किडींचा वाढलेला प्रादुर्भाव व शेतकºयांचा कीटकनाशकांवर होणारा खर्च टाळण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करण्यात आले असून, गत दोन वर्षांपासून कापूस पिकांवर वाढलेली गुलाबी बोंडअळी बघता यावर्षी एकात्मिक कीड व्यवस्थापन व कमी खर्चात भरपूर उत्पादन देणारे तंत्रज्ञान कृषी प्रदर्शनात शेतकºयांना बघता येणार आहे. शेतकºयांना व्यवसायाकडे वळण्यासाठी यावर्षी विशेष लक्ष देण्यात आले आहे. शेतकरी तसेच ज्या शेतकºयांनी विकसित केलेले प्रेरणादायी संशोधन, तंत्रज्ञानदेखील येथे असेल. यासोबतच शासनाच्या कृषी विभागाच्या योजना, उपक्रम, कृषी विद्यापीठाचे विविध संशोधन, तंत्रज्ञान, खासगी कंपन्यांचे दालन येथे असतील. बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी शेतकरी, महिला बचत गटांची दालनेदेखील उपलब्ध असतील. कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या मार्गदर्शनात यावर्षी तीन ऐवजी पाच दिवस प्रदर्शन चालणार असून, शेतकरी, विद्यार्थ्यांसाठी हे प्रदर्शन अभ्यासासाठीदेखील पर्वणी ठरणार आहे.
खेड्यातील शेतमालाची खेड्यातच प्रक्रिया होऊन गाव, शेतकरी समृद्ध व्हावा, यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी विभागाने विविध यंत्रे, कृषी अवजारे विकसित केली आहेत. ही यंत्रे येथे आकर्षण असतील. या कृषी विद्यापीठाने जातिवंत तसेच या भागातील पशुधनाचे ‘लाइव्ह शोकेस’ आहे. मोर्णा थडीच्या म्हशीपासून ते विदर्भातून नामशेष होत चाललेल्या गायींचे येथे संगोपन करण्यात आले आहे. परदेशी मुळाची थारपकर म्हशीसह गीर, लालकंधार गायी, उस्मानाबादी, बेरारी आदी जातींच्या शेळ्यादेखील येथे उपलब्ध असतील.

 

Web Title: Agricultural exhibition will be organized for five days at PDKV

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.