पदवी ग्रहणानंतर विद्यार्थ्यांनी केला कृषी विद्यापीठात जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 01:52 AM2018-02-06T01:52:02+5:302018-02-06T01:53:30+5:30

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. अनेक विद्यार्थी  विद्यापीठ सोडणार असल्याने सेल्फी काढून हे क्षण स्मरणात ठेवले. दरम्यान, बीएससी पदवी ग्रहण केल्यांनतर दीक्षांत सभागृहातही विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला.

After taking the degree, the students took the darling of Krishi Vidyapeeth | पदवी ग्रहणानंतर विद्यार्थ्यांनी केला कृषी विद्यापीठात जल्लोष

पदवी ग्रहणानंतर विद्यार्थ्यांनी केला कृषी विद्यापीठात जल्लोष

Next
ठळक मुद्दे दीक्षांत समारंभ आठवणी जपून ठेवण्यासाठी धडपड

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. अनेक विद्यार्थी  विद्यापीठ सोडणार असल्याने सेल्फी काढून हे क्षण स्मरणात ठेवले. दरम्यान, बीएससी पदवी ग्रहण केल्यांनतर दीक्षांत सभागृहातही विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला.
  दीक्षांत समारंभात जाण्यासाठी शिस्तबद्ध ओळीने पाहुण्यांसह विद्यार्थी पोहोचले. सकाळी १0 वाजता समारंभाला सुरुवात झाली. सुरुवातीला विदर्भाच्या गुणगौरवाचे गीत सादर करण्यात आले. त्यानंतर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू  डॉ. विलास भाले यांनी पहिल्या दीक्षांत समारंभात प्रास्ताविक केले. त्यांनी कृषी विद्यापीठाच्या संशोधन, शिक्षण, विस्ताराचा लेखाजोखा प्रास्ताविकातून माडंला. विद्यार्थ्यांची पदवी ग्रहणाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. कुलगुरूं च्या प्रास्ताविकानंतर लगेच पदवीदान समारंभाला सुरुवात झाली. सुरुवातीला पीएच.डी.च्या ४१ जणांना नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू  डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. त्यानंतर राज्याचे कृषिमंत्री तथा कृषी विद्यापीठाचे प्रतिकुलपती पांडुरंग फुंडकर यांनी बीएससी, एमएससीच्या विद्यार्थ्यांना सामूहिक पदवी प्रदान केली. पदवी ग्रहण केल्यानंतर विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. त्यानंतर नाबार्डचे माजी अध्यक्ष उमेशचंद्र सारंगी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तेव्हा विद्यार्थ्यांचे लक्ष दीक्षांत भाषणाकडे लागले होते. सारंगी यांच्या मार्गदर्शनानंतर डॉ. भटकर यांनी दीक्षांत भाषण केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी आपल्या जन्मभूमीचे दर्शन घ्या, गावाच्या विकासासाठीचे प्रयत्न करण्याचे आवाहन केले. त्यांनी त्याचे एक ते सव्वा तासाचे भाषण अध्र्या तासाच्या आत संपवले. विद्यापीठात सात ते आठ वर्ष शिक्षण घेतल्यानंतर परस्परांना सोडताना यावेळी विद्यार्थी भावूक झाल्याचे चित्र येथे होते. अनेक विद्यार्थ्यांनी सामूहिक छायाचित्र, सेल्फी काढली. 


विद्यार्थ्यांंना दीक्षांत पोषाख
कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात पोषाखाला महत्त्व आहे. पीएच.डी. ग्रहण करणार्‍या विद्यार्थ्यांना ‘मरूण’ रंगाचा पोषाख होता, तर एमएसीच्या विद्यार्थ्यांंना हिरव्या रंगाचा पोषाख होता, बीएससीच्या विद्यार्थ्यांंना केशरी रंगाचा पोषाख होता. विद्यार्थ्यांंनी दीक्षांत सभागृह गच्च भरले होते. समारंभाच्या शेवटी पसायदान व पोलीस पथकाच्या बॅण्डचे आकर्षण होते. राष्ट्रगीताने समारंभाची सांगता झाली.

माजी कुलगुरूं ची भेट
या समारंभाला माजी कुलगुरूं ची उपस्थिती होती. कुलगुरू  पदाच्या रिक्त जागेवर डॉ.व्ही.टी. रहाटे यांचा ९0 च्या दशकात कुलगुरू  म्हणून एक वर्षाचा कार्यकाळ होता. ते आता ९0 वर्षांंचे झाले, पण या दीक्षांत समारंभाला ते उपस्थित होते.

Web Title: After taking the degree, the students took the darling of Krishi Vidyapeeth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.