अकोला वाहतूक शाखेकडून १0२ ऑटोंवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 12:01 AM2017-12-22T00:01:25+5:302017-12-22T00:07:05+5:30

अकोला: उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून ग्रामीण परिसराचा प्रवासी वाहतुकीचा परवाना असताना अकोला शहरात प्रवासी वाहतूक करीत असलेल्या १0२ ऑटोंवर वाहतूक शाखेकडून गुरुवारी कारवाई करण्यात आली. या ऑटोचालकांकडून तब्बल ८0 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Action on 102 octroi from Akola Transport Branch | अकोला वाहतूक शाखेकडून १0२ ऑटोंवर कारवाई

अकोला वाहतूक शाखेकडून १0२ ऑटोंवर कारवाई

Next
ठळक मुद्देग्रामीण परिसराचा परवाना असताना अकोला शहरात प्रवासी वाहतूक ऑटोचालकांकडून ८0 हजार रुपयांचा दंड वसूल

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून ग्रामीण परिसराचा प्रवासी वाहतुकीचा परवाना असताना अकोला शहरात प्रवासी वाहतूक करीत असलेल्या १0२ ऑटोंवर वाहतूक शाखेकडून गुरुवारी कारवाई करण्यात आली. या ऑटोचालकांकडून तब्बल ८0 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
 जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनात वाहतूक शाखेचे प्रमुख विलास पाटील यांनी शहरातील बेशिस्त वाहतुकीला ताळय़ावर आणण्यासाठी विविध उपाययोजना सुरू केलेल्या आहेत. यामध्ये गत रविवारी ऑटोचालकांची बैठक घेऊन त्यांना सुरक्षित वाहतुकीचे धडे देण्यात आले. सोबतच वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले; मात्र त्यानंतरही शहरातील ऑटोचालक बेशिस्त धुडगूस घालीत असल्याचे वाहतूक शाखेचे प्रमुख विलास पाटील यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी गुरुवारी सकाळीच ऑटोंची तपासणी सुरू केली. यामध्ये  खासगी ऑटो, ग्रामीण परिसराचा परवाना असलेले ऑटो शहरात अवैध प्रवासी वाहतूक करीत असल्याचे उघड झाले. त्यानंतर या वाहन चालकांविरुद्ध मोटार वाहन चालक कायद्यानुसार कारवाई करण्यात आलेली आहे. वाहतूक शाखेने १0२ वाहनचालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई केलेली आहे. या दंडात्मक कारवाईमधून ७२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ऑटोचालकांसह सर्वच वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक शाखा प्रमुख विलास पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे. 

Web Title: Action on 102 octroi from Akola Transport Branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.