अकोल्यात विषारी अमोनियाची गळती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 03:40 AM2017-07-27T03:40:41+5:302017-07-27T03:40:41+5:30

अकोला : तहसील कार्यालयासमोरील महापालिकेच्या शॉपिंग कॉम्प्लेक्समधील एका आॅफसेटच्या दुकानात विषारी वायूची गळती झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली.

Acoustic Ammonia leak at akola | अकोल्यात विषारी अमोनियाची गळती!

अकोल्यात विषारी अमोनियाची गळती!

Next
ठळक मुद्देडोळ्यांची जळजळ; १० मिनिटात दुकाने बंद

सचिन राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : तहसील कार्यालयासमोरील महापालिकेच्या शॉपिंग कॉम्प्लेक्समधील एका आॅफसेटच्या दुकानात विषारी वायूची गळती झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. या वायुगळतीमुळे डोळ्यांची जळजळ होणे, अंधुक दिसण्यासारखे प्रकार घडले, तर काही व्यापाºयांचे अंग सुजल्याने बंद करण्यात आले. या गंभीर घटनेची माहिती रात्री ९ वाजेपर्यंत कोणत्याही प्रशासनाला नव्हती.
महापालिकेच्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये प्रकाश आॅफसेट अ‍ॅण्ड प्रिंटिंगचे कार्यालय आहे. विविध प्रकारचे फ्लेक्स येथे तयार करण्यात येतात.
फ्लेक्स प्रिंटिंगसाठी अमोनियासह विविध प्रकारच्या घातक रसायनांचा वापर करण्यात येतो. बुधवारी सायंकाळी येथे वायुगळती सुरू झाली आणि काही क्षणांतच संपूर्ण व्यापारी संकुलातील व्यापाºयांचे व त्यांच्या कामगारांसह ग्राहकांचे डोळे सुजणे, अंधुक दिसण्याचा प्रकार घडला, तर काही व्यापाºयांचे अंगाला सूज आली. संकुलातील एका डॉक्टरकडे सर्वांनी धाव घेतली, तर संबंधित डॉक्टरलाही हाच त्रास झाला.
त्यामुळे ५ ते १० मिनिटांतच महापालिकेच्या व्यापारी संकुलामधील तब्बल ३४ प्रतिष्ठाने तातडीने बंद करण्यात आली. या घटनेची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळ, महापालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाला रात्री उशिरापर्यंत नव्हती, त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

ब्ल्यू प्रिंट काढण्यासाठी अमोनिया हे रसायन वापरले जाते. बुधवारी सायंकाळी अमोनियाचे वेस्टेज केमिकल चुकीने उघडले गेले व जास्त प्रमाणात बाहेर पडल्यामुळे व्यापाºयांना डोळ्यांचा किरकोळ त्रास झाला; मात्र यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात आली.
-कल्पेश अग्रवाल, व्यावसायीक

व्यापारी संकुलातील एका दुकानातून वायुगळती झाल्याने डोळ्यांना जळजळ होण्याचा त्रास झाला. अंग खाजवण्याचाही त्रास झाल्याने आम्ही प्रतिष्ठान बुधवारी तातडीने बंद केले. काही साहित्य बाहेर राहिल्याने रात्री पुन्हा येऊन हे साहित्य ठेवण्यात आले.
- दीपक अग्रवाल, व्यावसायीक

डोळ्याला जळजळ होण्याचा व अंधुक दिसण्याचा त्रास झाला. अंगावर खाज सुटल्यासारखे झाल्याने तसेच वायुची दुर्गंधी प्रचंड असल्यामुळे प्रतिष्ठान तातडीने बंद केले.
- मनोज गोस्वामी, व्यावसायीक

अमोनियाच्या रसायनाची गळती झाल्याने डोळे लाल होणे, डोळ्याला खाज सुटणे, डोळे सुजणे, ड्रायनेस यासारखे गंभीर परिणाम होऊ शकतात; मात्र गळती झाल्यानंतर काही तासांच्या आतच डोळे थंड पाण्याने धुतल्यानंतर त्रास कमी होतो. जास्त प्रमाणात गळती झाल्यास नजरेला धोका निर्माण होऊ शकतो.
- डॉ. जुगलकिशोर चिराणिया,
नेत्ररोग तज्ज्ञ, अकोला.
-

 

Web Title: Acoustic Ammonia leak at akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.