मंगरूळपीर तालुक्यात वॉटर कप स्पर्धेसाठी ६७ गावाची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 04:50 PM2018-12-16T16:50:15+5:302018-12-16T16:50:45+5:30

पाणी फाऊंडेशनअंतर्गत मंगरूळपीर तालुक्याची फेरनिवड : नोंदणी करण्याचे आवाहन  लोकमत न्यूज नेटवर्क मंगरूळपीर ( वाशिम ) : पाणी फाउंडेशनअंतर्गत ...

67 villages registered for water cup competition in Mangrulpir taluka | मंगरूळपीर तालुक्यात वॉटर कप स्पर्धेसाठी ६७ गावाची नोंदणी

मंगरूळपीर तालुक्यात वॉटर कप स्पर्धेसाठी ६७ गावाची नोंदणी

Next

पाणी फाऊंडेशनअंतर्गत मंगरूळपीर तालुक्याची फेरनिवड : नोंदणी करण्याचे आवाहन 
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरूळपीर (वाशिम) : पाणी फाउंडेशनअंतर्गत मंगरुळपीर तालुक्याची  फेरनिवड करण्यात आली आहे असून, स्पर्धेत सहभागी होण्याकरिता नवीन नावनोंदणी सुरु झाली आहे. आतापर्यंत तालुक्यातील १३७ गावांपैकी ६७ गावांनी नोंदणी केली आहे. दरम्यान या स्पर्धेत अधिकाधिक गावांनी नोंदणी करण्याचे आवाहन तहसीलदार वैशाख वाहूरवाघ यांनी शुक्रवारी पंचायत समिती येथे आयोजित तालुकास्तरीय सभेत केले.
सभेला तहसीलदार वैशाख वाहूरवाघ, जि.प.चे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्तापे, पाणी फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक सुभाष नानवटे, पंचायत विस्तार अधिकारी पदमने, कृषि अधिकारी प्रल्हाद शेळके, शाखा अभियंता मुल्ला, पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक प्रशांत अवचार उपस्थित होते. पाणी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हे अभिनेते अमिर खान असून, या अभियानात महाराष्ट्रातील ७५ तालुक्यांचा समावेश आहे. यावर्षीदेखील मंगरूळपीर तालुक्याची फेरनिवड झाली आहे.पाणी फाऊंडेशनने गेल्या वर्षी राबविण्यात आलेल्या उपक्रमाचा फायदा बोरव्हा बू, लखमापुर, शेंदुरजेंना मोरे या गावांना मोठ्या प्रमाणात झाला आहे. अपुº्या पावसामुळे जिल्ह्यातील काही तालुके दुष्काळग्रस्त म्हणुन जाहिर केले असल्याने यावर मंगरुळपीर येथील बोरव्हा बु. गाव मात्र पाण्याच्या उपलब्धतेसाठी एक उदाहरण ठरत आहे. यासाठी तालुका पातळी पासून तर गांव पातळीपर्यंत प्रशासन, लोकसहभाग, नागरिकांचे बहुमोल सहकार्य मिळाले आहे, असे मत तहसिलदार वैशाख वाहूरवाघ यांनी व्यक्त केले. तालुक्यातील पाणी टंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी  गावागावात लोकांना प्रोस्ताहित करुण लोकसहभागातुन वेगवेगळे उपक्रम हाती घेणार आहे, असे  सुभाष नानवटे यांनी यावेळी सांगितले. 
मागील  वर्षी वॉटर कप स्पर्धेत  उत्तम काम करणाºया वॉटर हिरो, अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील वनरक्षक संतोष गौंड यांनी उपस्थितांना पाणी फाऊंडेशनसंदर्भात मार्गदर्शन केले. सुदाम इस्कापे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी यावेळी विचार व्यक्त केले.  स्पर्धेत सहभागी होण्याकरिता नवीन नावनोंदणी सुरु असून, तालुक्यातील  अधिकाधिक गावांनी नोंदणी करण्याचे आवाहन यावेळी उपस्थित मान्यवरांनी केले. 
प्रस्ताविक तालुका समन्वयक समाधान वानखडे यांनी तर संचालन अतुल तायडे यांनी केले. कार्यक्रमाला तालुक्यातील ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, सरपंच, स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी, जलमित्र, वॉटर हीरो रोजगार सेवक यांची उपस्थिती होती. प्रशांत अवचार यांनी आभार मानले.

Web Title: 67 villages registered for water cup competition in Mangrulpir taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.