अकोला जिल्ह्यातील ५६८ विद्यार्थी प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीपासून वंचित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 01:48 PM2018-01-15T13:48:37+5:302018-01-15T13:52:32+5:30

अकोला : शासनाच्यावतीने दरवर्षी अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती देण्यात येते; परंतु २00९-१0 ते २0१४-१५ या कालावधीत प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीस पात्र ठरलेले अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी चार वर्षांपासून शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत.

568 students from Akola district are deprived of pre-matric scholarship! | अकोला जिल्ह्यातील ५६८ विद्यार्थी प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीपासून वंचित!

अकोला जिल्ह्यातील ५६८ विद्यार्थी प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीपासून वंचित!

Next
ठळक मुद्दे२00९-१0 ते २0१४-१५ या कालावधीत प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीस पात्र ठरलेले अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी चार वर्षांपासून शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत.शाळा व शिक्षकांच्या चुकीमुळे जिल्ह्यातील ५६८ विद्यार्थ्यांच्या खात्यात ५ लाख ६८ हजार रुपयांची रक्कम जमा होऊ शकलेली नाही. विद्यार्थ्यांच्या बँकेची माहिती सरल प्रणालीद्वारे भरल्यासच, शिष्यवृत्ती जमा होईल.

अकोला : शासनाच्यावतीने दरवर्षी अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती देण्यात येते; परंतु २00९-१0 ते २0१४-१५ या कालावधीत प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीस पात्र ठरलेले अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी चार वर्षांपासून शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. शाळा व शिक्षकांच्या चुकीमुळे जिल्ह्यातील ५६८ विद्यार्थ्यांच्या खात्यात ५ लाख ६८ हजार रुपयांची रक्कम जमा होऊ शकलेली नाही.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना देण्यात येणारी प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती रखडलेली असून, चुकीच्या आणि अपुºया बँक खात्यांच्या माहितीमुळे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये शिष्यवृत्ती जमा होऊ शकलेली नाही. अप्राप्त शिष्यवृत्ती विद्यार्थी सरल डाटा बेसमध्ये शोधून व त्यांच्याबाबतची आवश्यक माहिती प्राप्त करून ही शिष्यवृत्तीची रक्कम खात्यांमध्ये जमा करण्याचा आदेश अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालयाने दिले होते; परंतु २00९-१0 ते २0१४-१५ पर्यंतची यादी वगळता, २0१२-१३ व २0१३-१४ साठी महाआॅनलाइनकडून डाटा अप्राप्त असल्यामुळे विद्यार्थी शोधता न आल्यामुळे ही शिष्यवृत्ती रखडली असल्याचे कारण देण्यात येत आहे. त्यामुळे अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालयाने पुन्हा सर्व विद्यार्थ्यांच्या बँकेची माहिती सरल प्रणालीद्वारे भरण्याच्या सूचना दिल्या आहेत.

कशी भरावी माहिती
सरल प्रणालीद्वारे वर्षनिहाय सर्व विद्यार्थ्यांच्या बँकेचे नाव, खाते क्रमांक, आयएफएससी, आधार कार्ड क्रमांक व पालकांचा मोबाइल आदी माहिती, विद्यार्थ्यांची माहिती सरल प्रणालीमध्ये शाळेच्या लॉगिन व संचालनालयाच्या संकेतस्थळावर दिली आहे. सरल प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांची आॅनलाइन माहिती घेण्यासाठी शाळेने त्यांच्या सरल लॉगिन आयडीवर व पासवर्डचा वापर करावा. शिक्षणाधिकारी निरंतर यांच्यासाठी नवीन लॉगिन आयडी व पासवर्ड तयार केला असून, शैक्षणिक वर्षात एका विद्यार्थ्याचे नाव एकापेक्षा जास्तवेळा आल्यास, त्या विद्यार्थ्यांची माहिती फक्त एकदा भरून उर्वरित माहिती अपूर्ण ठेवा व याबाबतची माहिती शिक्षणाधिकारी, संचालक, अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण, पुणे यांना कळवा. सरल प्रणालीमध्ये शिक्षणाधिकाºयांनी त्यांच्या लॉगिनमधून शाळेने भरलेली विद्यार्थ्यांच्या माहितीची, बँक खात्याच्या पहिल्या पानाची प्रत व आधार कार्डाची प्रतद्वारे पडताळणी करावयाची आहे. शाळेने दिलेल्या माहितीमध्ये दुरुस्ती करावयाची असल्यास ती करता येईल.

 

Web Title: 568 students from Akola district are deprived of pre-matric scholarship!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.