वर्‍हाडात ५१.१९ टक्के जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 02:01 AM2017-10-24T02:01:24+5:302017-10-24T02:01:58+5:30

अकोला: यावर्षी अद्याप दमदार सार्वत्रिक पाऊस झाला  नसल्याने पश्‍चिम विदर्भातील (वर्‍हाड) धरणांचे पाणलोट क्षेत्र  कोरडेच असून, आजमितीस सर्व धरण मिळून केवळ ५१.१९  टक्केच जलसाठा शिल्लक आहे. अ

51.19 percent water storage in Varhad! | वर्‍हाडात ५१.१९ टक्के जलसाठा!

वर्‍हाडात ५१.१९ टक्के जलसाठा!

Next
ठळक मुद्देअकोल्यातील चित्र भीषणकाटेपूर्णात २0.८६ टक्केच जलसाठा 

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: यावर्षी अद्याप दमदार सार्वत्रिक पाऊस झाला  नसल्याने पश्‍चिम विदर्भातील (वर्‍हाड) धरणांचे पाणलोट क्षेत्र  कोरडेच असून, आजमितीस सर्व धरण मिळून केवळ ५१.१९  टक्केच जलसाठा शिल्लक आहे. अकोलेकरांची तहान  भागविणार्‍या काटेपूर्णा धरणात २0.८६ टक्केच जलसाठा  शिल्लक आहे. यात अर्धा गाळ असल्याने अकोलेकरांवरील  जलसंकट गडद झाले आहे.या सर्व प्रतिकूल परिस्थिती १५  दिवसांतून एकदा सोडणार पाणी
स्थितीमुळे महापालिका प्रशासन अकोलकरांना १५ दिवसांतून  एकदा पाणी पुरवठा करणार असल्याचे वृत्त आहे. पावसाळा सं पला; पण दमदार पाऊस झाला नसल्याने वर्‍हाडातील (पश्‍चिम  विदर्भ) धरणातील जलसाठय़ाची टक्केवारी यावर्षी पुढे  सरकलीच नाही. अकोला, बुलडाणा, वाशिम जिल्हय़ात सात त्याने पावसाची अनिश्‍चितता असते; पण गतवर्षी पावसाने बर्‍या पैकी हजेरी लावली असली, तरी अकोला, बुलडाणा व वाशिम  जिल्हय़ांतील धरणे शंभर टक्क्यांच्या आतच होती. यावर्षी  पावसाने दडी मारली आहे. २३ ऑक्टोबर रोजी अकोला  जिल्ह्यातील काटेपूर्णा धरणात २0.८६ टक्केच जलसाठा उपलब्ध  आहे. याच जिल्हय़ातील मोर्णा मध्यम प्रकल्पात १८.३८, निर्गुणा  ६0.५२, उमा धरणात ९.९३ टक्के असून, दगडपारवा धरण शून्य  टक्के आहे. अकोला, बुलडाणा आणि अमरावती या तीन  जिल्हय़ांच्या सीमेवर असलेल्या वान धरणात सध्या ९८.८८  टक्के जलसाठा आहे

Web Title: 51.19 percent water storage in Varhad!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी