अकोला जिल्हय़ातील ५१ गावांमध्ये उपसरपंचांची निवड शांततेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 01:55 AM2017-12-25T01:55:45+5:302017-12-25T01:56:09+5:30

अकोला : जिल्ह्यातील कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या असून, सरपंच थेट जनतेतून निवडून आलेले आहेत. या ग्रामपंचायतींच्या नवनिर्वाचित सरपंचांचा पदभार आणि उपसरपंच निवडणुकीचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. २४ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील ५१ गावांमध्ये उपसरपंचांची निवड करण्यात आली. अनेक ठिकाणी अविरोध तर काही ठिकाणी हात वर करून मतदान घेण्यात आले. 

In the 51 villages of Akola district, the selection of post-Panchayats is peaceful | अकोला जिल्हय़ातील ५१ गावांमध्ये उपसरपंचांची निवड शांततेत

अकोला जिल्हय़ातील ५१ गावांमध्ये उपसरपंचांची निवड शांततेत

Next
ठळक मुद्देनवनिर्वाचित सरपंचांनी स्वीकारला पदभार

अकोला : जिल्ह्यातील कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या असून, सरपंच थेट जनतेतून निवडून आलेले आहेत. या ग्रामपंचायतींच्या नवनिर्वाचित सरपंचांचा पदभार आणि उपसरपंच निवडणुकीचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. २४ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील ५१ गावांमध्ये उपसरपंचांची निवड करण्यात आली. अनेक ठिकाणी अविरोध तर काही ठिकाणी हात वर करून मतदान घेण्यात आले. 

मूर्तिजापूर तालुक्यात नऊ उपसरपंचांची निवड
मूर्तिजापूर तालुक्यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायतींच्या ११ उपसरपंचांच्या निवडीसाठी २४ डिसेंबर रोजी संबंधित ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये विशेष सभा पार पडली. यापैकी जांभा व खोळद या दोन ग्रामपंचायतींची विशेष सभा गणपूर्तीअभावी तहकूब करण्यात आली. उर्वरित नऊ ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांची निवड करण्यात आली. या ग्रामपंचायतींच्या सरपंचांची जनतेमधून यापूर्वीच थेट निवड करण्यात आली आहे.
या निवडणुकीमध्ये शेलूनजीक ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी शोभा बाळकृष्ण बोंडे यांची निवड करण्यात आली. समशेरपूर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी रंजना जगन मारवाड, हिवरा कोरडे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी मीना सुधीर गेडाम, माना ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी मंगेश साहेबराव वानखडे, राजुरा सरोदे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी अरविंद ज्ञानेश्‍वर सरोदे, वाई माना ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी अजय यशवंत वानखडे, सोनाळा ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी रणजिताकौर हरनामसिंग बाजहिरे, बिडगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी भास्कर भीमराव येवले तर वडगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी गुंफा उत्तम शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. 

Web Title: In the 51 villages of Akola district, the selection of post-Panchayats is peaceful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.