शिरपूर येथे गोमांसासह गुरांचे ३९ चामडे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 08:31 PM2017-08-20T20:31:56+5:302017-08-20T20:32:17+5:30

आलेगाव/ खेट्री (अकोला):  शिरपूर येथील बंद घरातून १० किलो गोमांस, बैल व वासरांचे ३९ चामडे चान्नी पोलिसांनी २० आॅगस्ट रोजी दुपारी १२ वाजता जप्त केले. 

39 cattle of Gaura with Gomans seized in Shirpur | शिरपूर येथे गोमांसासह गुरांचे ३९ चामडे जप्त

शिरपूर येथे गोमांसासह गुरांचे ३९ चामडे जप्त

Next
ठळक मुद्देबंद घरातून १० किलो गोमांस, बैल व वासरांचे ३९ चामडेचान्नी पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
आलेगाव/ खेट्री (अकोला):  शिरपूर येथील बंद घरातून १० किलो गोमांस, बैल व वासरांचे ३९ चामडे चान्नी पोलिसांनी २० आॅगस्ट रोजी दुपारी १२ वाजता जप्त केले. 
शिरपूर येथील एका घरात बैल व वासरांचे चामडे असल्याची माहिती चान्नीचे ठाणेदार वैभव पाटील यांना मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी त्यांच्या सहकाºयांसह सदर घरावर धाड टाकली. यावेळी गुरांचे ३९ चामडे, साहित्य व एक दुचाकी असा ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी शेख उस्मान शेख बुरहान याच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याच्या  ४२९ , ५, ५ (अ), ६,७, ९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक आदिनाथ घाटेकर करीत आहे. वृत्त लिहीपर्यंत आरोपीला अटक करण्यात आली नव्हती. 

Web Title: 39 cattle of Gaura with Gomans seized in Shirpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.