घरफोड्याकडून दोन चोर्‍यातील १२५ ग्रॅम सोने जप्त

By admin | Published: June 15, 2014 08:49 PM2014-06-15T20:49:10+5:302014-06-15T21:59:13+5:30

अकोला स्थानिक गुन्हे शाखेने ५ जून रोजी अटक केलेल्या घरफोड्याची चौकशी करून त्याने सराफाला विकलेले १२५ ग्रॅम सोने व ४४0 ग्रॅम चांदी पोलिसांनी जप्त केली.

125 grams of gold from the burglar seized gold | घरफोड्याकडून दोन चोर्‍यातील १२५ ग्रॅम सोने जप्त

घरफोड्याकडून दोन चोर्‍यातील १२५ ग्रॅम सोने जप्त

Next

अकोला : स्थानिक गुन्हे शाखेने ५ जून रोजी अटक केलेल्या घरफोड्याची चौकशी करून त्याने सराफाला विकलेले १२५ ग्रॅम सोने व ४४0 ग्रॅम चांदी पोलिसांनी जप्त केली. घरफोड्याला न्यायालयाने मंगळवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
शहरातील केडिया प्लॉटमध्ये राहणार्‍या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. लीना आगाशे यांच्याकडे १ नोव्हेंबर २0१२ रोजी ३ लाख रुपयांची घरफोडी झाली होती. या घरफोडीमध्ये मोहता मिल रोडवरील संजय नगरात राहणारा अ˜ल घरफोड्या शेख इकबाल अहमद शेख याचा समावेश असल्याचा स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना संशय होता. पोलिसांनी ५ जून रोजी शेख इकबाल याला अटक केली. त्याची चौकशी केली. चौकशीमध्ये त्याने डॉ. लीना आगाशे यांच्याकडे घरफोडी केल्याची कबुली दिली. यासोबतच फिरदोस कॉलनीत राहणार्‍या फिरदोस परवीन मोहम्मद हुसैन यांच्याकडेही घरफोडी केल्याचे पोलिसांना सांगितले. घरफोडीमधील लंपास केलेले सोने व चांदी न्यू तापडिया नगरात राहणारा सराफा व्यवसायी सुरेश रमेश शेरकर (३0) याला विकल्याची माहितीही त्याने दिली. या माहितीवरून पोलिसांना सराफा व्यवसायी सुरेश शेरेकर याला अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून डॉ. आगाशे यांच्याकडील १.१ ग्रॅम सोने व ४४0 ग्रॅम चांदी, तर रेहाना परवीन यांच्याकडील घरफोडीतील २४ ग्रॅम सोने जप्त केले. जप्त केलेल्या सोन्याची किंमत ३ लाख ४२ हजार ४00 रुपये आहे. आरोपी शेख इकबाल याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला पुन्हा १३ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Web Title: 125 grams of gold from the burglar seized gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.