वीजवाहक तारा अंगावर पडल्याने युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 10:14 AM2018-09-09T10:14:22+5:302018-09-09T10:14:24+5:30

तालुक्यातील लांडकवाडी येथे सकाळी सहा वाजता वीजवाहक तारा तुटून झालेल्या अपघातामध्ये एक युवक तर एक म्हैस जागीच ठार झाले आहेत.

Yucca killed due to electricity star wound | वीजवाहक तारा अंगावर पडल्याने युवक ठार

वीजवाहक तारा अंगावर पडल्याने युवक ठार

googlenewsNext

पाथर्डी : तालुक्यातील लांडकवाडी येथे सकाळी सहा वाजता वीजवाहक तारा तुटून झालेल्या अपघातामध्ये एक युवक तर एक म्हैस जागीच ठार झाले आहेत.
तालुक्यातील लांडकवाडी येथे सकाळी सहा वाजता सोन्याबापू अर्जुन कावळे (वय -२२) हे घराच्या अंगणात बांधलेल्या म्हशीची धार ( दूध) काढण्याचे काम करत होते. त्याचवेळी ग्रामपंचायतीने गावात बसवण्यात आलेल्या पथदिव्याच्या तारा तुटून सोन्याबापू तसेच म्हशीच्या अंगावर पडली. वीजवाहक तारांमधून वीज प्रवाह वाहत असल्याने विजेचा जोरदार धक्का बसल्याने सोन्याबापू यांनी आरडाओरडा केला. परंतु विजेचा जोरदार झटका बसल्याने सोन्याबापू तसेच म्हशीचा क्षणात जागीच मृत्यू झाला. ग्रामस्थांनी तात्काळ वीजप्रवाह रोहित्रातून खंडित केला त्यानंतर वीज वाहक ताराच्या मधून सोन्याबापू व म्हशीची सुटका केली. परंतु तोपर्यंत दोघांचाही प्राण गेला होता. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार सदरील पथदिव्यांसाठी बसवण्यात आलेल्या वीजवाहक तारा गेल्या अनेक दिवसांपासून सैल पडल्या होत्या, याबाबत ग्रामस्थांनी दरुस्तीची मागणी केली होती. परंतु वेळीच दुरुस्ती न झाल्याने हा अनर्थ ओढावला. मयत सोन्याबापू यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सोन्याबापू यांचे शवविच्छेदनासाठी पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
 

 

Web Title: Yucca killed due to electricity star wound

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.