यंदा प्रथमच हजारो भाविक घेणार एकाच वेळी दर्शन

By Admin | Published: September 23, 2014 01:05 AM2014-09-23T01:05:55+5:302014-09-23T01:37:12+5:30

पाथर्डी : शारदीय नवरात्रौत्सव अवघ्या दोन दिवसावर येवून ठेपला असून, मोहटादेवी गडावर व पाथर्डी शहरात सर्वत्र नवरात्राची लगबग सुरु झाली आहे.

This year, for the first time thousands of devotees will take a glimpse of Darshan | यंदा प्रथमच हजारो भाविक घेणार एकाच वेळी दर्शन

यंदा प्रथमच हजारो भाविक घेणार एकाच वेळी दर्शन

googlenewsNext


पाथर्डी : शारदीय नवरात्रौत्सव अवघ्या दोन दिवसावर येवून ठेपला असून, मोहटादेवी गडावर व पाथर्डी शहरात सर्वत्र नवरात्राची लगबग सुरु झाली आहे. यंदा वरुणराजाने कृपा केल्याने गडाचा परिसर निसर्गरम्य बनला आहे. मंदिराच्या जीर्णाेद्धाराचे काम अत्यंत सुबक पद्धतीने झाल्यामुळे तसेच गाभाऱ्यातून एकाचवेळी हजारो भाविक दर्शन घेवू शकतील, अशी व्यवस्था असल्यामुळे भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
बीड-नगर जिल्ह्याच्या हद्दीवर पाथर्डीपासून ९ कि.मी. अंतरावर अग्नेय दिशेला उंच डोंगरावर मोहटादेवी गड आहे. गडावर राज्यासह परराज्यातून भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. मोहटादेवीचे स्थान हे माहूरच्या देवीचे ठाणे आहे. भक्तांच्या प्रार्थनेनुसार अश्विन शुद्ध एकादशीला देवी गडावर येवून राहिली अशी अख्यायिका आहे. राज्यात सर्वत्र विजयादशमीच्या दिवशी देवीच्या यात्रा होतात. मात्र मोहट्याची यात्रा एकादशीला भरते. अलीकडील काही वर्षात मोहटा देवस्थान नावारुपाला आले असून शिर्डीनंतर मोठी गर्दी मोहटा गडावर असते. भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मंगळवार, शुक्रवार व पौर्णिमेच्या दिवशी अलोट गर्दी होते़
नवरात्रौत्सव दोन दिवसावर येऊन ठेपल्याने गडावर स्वच्छता करण्यात आली आहे़ तसेच पाथर्डी शहरातही पालिकेने स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. नवरात्रकाळात भाविकांची सेवा करण्यासाठी शहरात सुमारे दहा ते बारा मंडळे असतात त्यांचेही सध्या मंडप उभारणीचे काम सुरु असून भाविकांसाठी मोफत चहा, नाष्टा व फराळ या मंडळामार्फत दिला जातो. सर्व जाती धर्माचे युवक भाविकांची सेवा करण्यासाठी पुढे असतात हे येथील विशेष! गेल्या अनेक वर्षापासून तरुणांमध्ये वाढत चाललेला सेवाभाव शहरात कुतुहलाचा विषय बनला आहे़ यंदा परिसरात चांगला पाऊस झाल्याने गडावरील परिसर हिरवाकंच झाला आहे. तसेच डोंगरपायथ्याला असलेल्या चार ते पाच पाझर तलावात मुबलक पाणी साचल्याने हा परिसर अधिकच मोहक दिसत आहे़
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: This year, for the first time thousands of devotees will take a glimpse of Darshan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.