Wife woke up without breastfeeding; The case of Patelwadi of Shrirampur, treatment of the woman | मटण न केल्याने पत्नीस पेटविले; श्रीरामपूरच्या पटेलवाडीची घटना, महिलेवर उपचार सुरू

श्रीरामपूर : पत्नीने जेवणामध्ये मटण केले नाही म्हणून पतीने अंगावर रॉकेल टाकून पत्नीस पेटवून दिल्याची घटना पटेलवाडी (ता. श्रीरामपूर) येथे घडली. गंभीररीत्या भाजलेल्या महिलेस साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी शुक्रवारी (दि़ २९) गुन्हा दाखल करण्याता आला आहे.
भाजलेल्या महिलेचे नाव आशाबाई नाना पारखे (वय ४०, रा.पारखेवस्ती, पटेलवाडी) असे आहे. पोलिसांनी महिलेचा रुग्णालयात जबाब नोंदवून आरोपी पती नानू चिलखू पारखे यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. गुरुवारी सायंकाळी ६ वाजता आरोपी नानू हा घरी आल्यानंतर जेवणासाठी मटण का केले नाही? याचा राग धरून पत्नी आशाबाई हिला शिवीगाळ करून लाथाबुक्क्याने मारहाण केली. तुला जिवंत ठेवणार नाही, असे म्हणत घरातील रॉकेलच्या कॅनमधील रॉकेल अंगावर ओतून चुलीतील जळत्या लाकडाने पेटवून देत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन भाजलेल्या महिलेची भेट घेऊन जबाब नोंदविला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे करीत आहेत.