कोण आहे श्रीगोंद्याचा युसेन बोल्ट? ज्याने सात हजार धावपटूंना मागे टाकून जिंकली नेव्हीची मॅरेथॉन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 12:48 PM2017-11-30T12:48:19+5:302017-11-30T13:19:42+5:30

युसेन सेंट लिओ बोल्ट हा एक जमैकन धावपटू़ जागतिक धावपट्टीवर तो २०१७ साली निवृत्त झाला. त्याचवेळी श्रीगोंद्याच्या रानात शेळ्या, मेंढ्या वळणा-या एका तरुणाने धावपट्टीवर पाय ठेवले अन् युसेन बोल्टच्या धावगतीशी स्पर्धा करु लागला. नेव्हीच्या मॅरेथॉन स्पर्धेत सात हजार धावपटूंना मागे टाकत त्याने विक्रम नोंदवला.

Who is Shrigonda's Usen Bolt? He won Navy Marathon, which surpassed seven thousand athletes | कोण आहे श्रीगोंद्याचा युसेन बोल्ट? ज्याने सात हजार धावपटूंना मागे टाकून जिंकली नेव्हीची मॅरेथॉन

कोण आहे श्रीगोंद्याचा युसेन बोल्ट? ज्याने सात हजार धावपटूंना मागे टाकून जिंकली नेव्हीची मॅरेथॉन

Next
ठळक मुद्देश्रीगोंद्याच्या रानात शेळ्या, मेंढ्या वळणा-या एका तरुणाने धावपट्टीवर पाय ठेवले अन् युसेन बोल्टच्या धावगतीशी स्पर्धा करु लागला.नेव्हीच्या मॅरेथॉन स्पर्धेत सात हजार धावपटूंना मागे टाकत त्याने विक्रम नोंदवला. बारावीत असताना त्याने पहिल्यांदा धावपटीवर पाय ठेवला. त्यावेळी त्याच्या पायात बूट नव्हता, अंगात सूट नव्हता. अनवाणी पायांनी धावत तालुकास्तरीय स्पर्धेत त्याने पहिले सुवर्णपदक जिंकले.

बाळासाहेब काकडे
श्रीगोंदा : युसेन सेंट लिओ बोल्ट हा एक जमैकन धावपटू़ जागतिक धावपट्टीवर तो २०१७ साली निवृत्त झाला. त्याचवेळी श्रीगोंद्याच्या रानात शेळ्या, मेंढ्या वळणा-या एका तरुणाने धावपट्टीवर पाय ठेवले अन् युसेन बोल्टच्या धावगतीशी स्पर्धा करु लागला. नेव्हीच्या मॅरेथॉन स्पर्धेत सात हजार धावपटूंना मागे टाकत त्याने विक्रम नोंदवला. असा हा चित्याच्या वेगाने धावणारा धावपटू आहे गणेश विठ्ठल पारखे.
श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरी येथे गरिब शेतकरी कुटूंबात गणेचा जन्म झाला. वडिलोपार्जित अवघी तीन एकर जमीन, एक भाऊ राहूल. तो पदवीधर बेरोजगार. आई-वडिल निरक्षर. अशी गणेश कौटुंबिक पार्श्वभूमी.
मासाळवाडीत गणेशने प्राथमिक तर दहावीपर्यंतचे शिक्षण नागवडे विद्यालयात घेतले. उच्च माध्यमिक शिक्षण श्रीगोंदा येथील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात झाले. बारावीत असताना त्याने पहिल्यांदा धावपटीवर पाय ठेवला. त्यावेळी त्याच्या पायात बूट नव्हता, अंगात सूट नव्हता. अनवाणी पायांनी धावत तालुकास्तरीय स्पर्धेत त्याने पहिले सुवर्णपदक जिंकले.
सैन्य दलाच्या भरतीत गणेशला डावलले गेले. त्यामुळे त्याने ध्येय ठरवले की सैन्य दलाच्या व्यासपीठावर पहिल्या क्रमांकाचे बक्षिस पटकवायचेच. त्याने तयारी सुरु केली. अनवाणी पायांनी दगडधोंड्याची वाट तुडवत तो रोज सकाळी व संध्याकाळी सराव करु लागला. छत्रपती शिवाजी महाविद्यालयात बीएचे शिक्षण घेत असताना पुणे विद्यापीठाने घेतलेल्या पाच किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत गणेशने सुवर्ण पदक जिंकले. स्टुडंट आॅलंपिक स्पर्धेत पाच किलोमीटर राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्ण आणि राष्ट्रीय पातळीवर कांस्य पदक पटकावले. पुण्याची मयुर ट्रॉफी आणि इंटरझोनल क्रॉसकंट्री स्पर्धा गाजविली.
पुणे, बारामती, अकोला, मिरजगाव, अमरावती येथे झालेल्या मॅरेथॉन स्पर्धांमध्ये त्याने सुवर्ण पदक पटकावण्याची कामगिरी केली. राज्यभर स्पर्धांसाठी फिरताना त्याची राहण्याची, मुक्कामाची व्यवस्था नसायची़ तो रात्री प्राथमिक शाळा गाठून पडवीतच झोपायचा आणि दुस-या दिवसी स्पर्धा जिंकूनच माघारी यायचा. नुकतीच मुंबईत नेव्हीच्या वतीने मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत गणेश पारखे याने चित्याच्या वेगाने धावत पाच किलोमीटरचे अंतर अवघ्या पंधरा मिनिटात पूर्ण करुन सुवर्ण पदक जिंकले. त्याचा आदर्श आहे, युसेन बोल्ट. युसेन बोल्टच्या गतीने धावण्याच्या स्वप्नाचा तो पाठलाग करतोय. दिनेश भालेराव, सतिष चोरमले, राहूल उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तो धावण्याचे धडे गिरवतोय.

डझनभर पदके पण बुटासाठी पैसे नाहीत

गणेश पारखे याच्याकडे मॅरेथॉन स्पर्धेत मिळविलेली डझनभर पदके आहेत. पण त्याच्याकडे धावण्यासाठी चांगल्या प्रतिचे बूट नाहीत. नगरला जाण्यासाठी कधी कधी पैसेही नसतात. मित्रांकडून उसनवारी करीत त्याने अनेक स्पर्धा गाजविल्या. त्याची धावगती पाहून त्याला अनेकांनी मदतीचा हात दिला आहे. अग्नीपंख फाऊंडेशनने दहा हजार, बाळासाहेब नाहाटा यांनी पाच हजाराची मदत दिली. तर माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी गणेशची नगरमध्ये राहण्याची व्यवस्था केली. नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी गणेशला एक लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. रमेश गुगळे (जामखेड) यांनीही मदत पाठवली आहे.

Web Title: Who is Shrigonda's Usen Bolt? He won Navy Marathon, which surpassed seven thousand athletes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.