आॅपरेशन ब्लॅक टोर्नाडो सक्सेस होते तेव्हा... - नगरचे भूमिपूत्र राष्ट्रपती पदकाचे मानकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 02:59 PM2018-01-25T14:59:26+5:302018-01-25T15:04:15+5:30

मुंबई पोलीस दलात कार्यरत असताना २६/११ च्या हल्यातील अतिरेक्यांशी संघर्ष करण्याची संधी मिळाली ही आजपर्यंतच्या करिअरमधील अभिमानाची बाब असल्याचे मत या आॅपरेशनमध्ये सहभागी झालेले पोलीस निरिक्षक ज्ञानेश्वर रायभान वाघ यांनी ‘लोकमत’ची बोलताना व्यक्त केले.

When the Operation Black Tornado was elected ... - The President of the City's President, the President's Medal | आॅपरेशन ब्लॅक टोर्नाडो सक्सेस होते तेव्हा... - नगरचे भूमिपूत्र राष्ट्रपती पदकाचे मानकरी

आॅपरेशन ब्लॅक टोर्नाडो सक्सेस होते तेव्हा... - नगरचे भूमिपूत्र राष्ट्रपती पदकाचे मानकरी

googlenewsNext

अरूण वाघमोडे
अहमदनगर : हॉटेल ताजवर अतिरेक्यांनी हल्ला केल्याची खबर मिळातच मुंबई क्राईम ब्रॅन्चची ५० जणांची टीम तत्काळ दाखल झाली.. काही वेळातच एनएसजी कमांडोंनी हॉटेलचा ताबा घेतला. कमांडो ग्राऊंड बॅकअप देण्याची जबाबदारी आमच्यावर होती. अतिरेक्यांच्या टार्गेटवर असलेल्यांना सुरक्षित बाहेर काढने हेच लक्ष्य होते. हॉटेलमधून फक्त फायरिंग अन् किंचाळ्यांचा आवाज घुमत होता. अखेर ५९ तासानंतर शेवटचा अतिरेकी मारला गेला अन् ‘आॅपरेशन ब्लॅक टोर्नाडो’ सक्सेस झाले. मुंबई पोलीस दलात कार्यरत असताना २६/११ च्या हल्यातील अतिरेक्यांशी संघर्ष करण्याची संधी मिळाली ही आजपर्यंतच्या करिअरमधील अभिमानाची बाब असल्याचे मत या आॅपरेशनमध्ये सहभागी झालेले पोलीस निरिक्षक ज्ञानेश्वर रायभान वाघ यांनी ‘लोकमत’ची बोलताना व्यक्त केले.
नेवासा तालुक्यातील उस्थळ दुमाला येथील ज्ञानेश्वर वाघ हे सध्या मुंबईत कायदा व सुव्यवस्था शाखेत कार्यरत आहेत. उत्कृष्ठ कामगिरीसाठी प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांना राष्ट्रपदी पदक जाहीर झाले आहे. शेतकरी कुटुंबात जन्म आणि घरात कुठलीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना ज्ञानेश्वर यांनी जिद्ध आणि चिकाटीने विशेष प्राविण्यासह बीटेक आणि एमटेक पदवी प्राप्त केली. पुढे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत महाराष्ट्र पोलीस दलात अधिकारी पदावर रूजू झाले. मुंबईत पोलीस दलात विविध शाखांमध्ये मध्ये काम करताना ज्ञानेश्वर यांनी कामातील तत्परता अधोरेखित करत अनेक गुन्ह्यांची उकल केली.

गौरवास्पद कामगिरी

मुंबई परिसरात धुमाकूळ घालणारी कट्टाशेखर गँगने १९९७ साली मुंबई-अहमदाबात महामार्गावर महानंदा दूध डेअरीची ५७ लाखांची कॅश लुटली. ज्ञानेश्वर तेंव्हा मुंबईत वाकोला पोलीस ठाण्यात कार्यरत होते. ज्ञानेश्वर यांच्यासह त्यांच्या टीमने कट्टाशेखरसह त्याच्या टोळीतील आठ जणांना तामीळनाडूतून अटक केली. मुंबईत एका प्रदर्शनातून दुबईच्या लुटणारूंनी सव्वा कोटींचे हिरे चोरले होते. या गुन्ह्यातील आरोपींना वाघ यांच्या नेतृत्वाखालील टीमने २४ तासांच्या आत दुबई येथून अटक केली. ज्ञानेश्वर यांच्या पोलीस दलातील २३ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांना २९ बक्षिसे मिळाली आहेत. यामध्ये उत्कृष्ठ प्रशिक्षणार्थी, क्राईम बॅ्रन्चचे तत्कालीन अधिकारी देवेन भारती यांच्या नेतृत्वाखाली टीममध्ये २६/११ च्या हल्यात विशेष कामगिरी, हि-यांचा २४ तासांत शोध, उत्तर कोरिया खंडात शांतीदूत, न्यायमूर्ती कापडिया यांच्याहस्ते बक्षिस, विधी, एमबीए पदवीत विशेष प्राविण्य, मानवी हक्क विभागात प्रथम ते आता राष्ट्रपती पदकाचे मानकरी

फोटो २५ पीएसआय वाघ

Web Title: When the Operation Black Tornado was elected ... - The President of the City's President, the President's Medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.