पॉझिटिव्ह रुग्णांचे काय आहेत अनुभव....वाचा सविस्तरपणे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 11:42 AM2020-07-22T11:42:43+5:302020-07-22T11:44:33+5:30

कोरोनावर आत्तापर्यंत निश्चित कोणतीही उपचार पद्धती नाही़ त्यामुळे रुग्णाची प्रतिकारशक्ती वाढविण्यावर भर देण्याशिवाय डॉक्टरांकडेही काही पर्याय नाही़ रुग्णाला श्वसनाचा त्रास वाढला असेल तर व्हेंटिलेटरवर ठेवले जाते़ हे उपचार सरकारी दवाखान्यात मोफत होतात़ मात्र, खासगी रुग्णालयात उपचार घेतलेल्या रुग्णांना लाखाची बिले पाहूनच ‘ताप’ आला आहे़ उपचार तर नाही पण दवाखान्याचे लाखाचे भाडे भरायला आलो होतो का, असाच पश्चाताप अनेक रुग्णांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला.

What are the experiences of positive patients .... read in detail. | पॉझिटिव्ह रुग्णांचे काय आहेत अनुभव....वाचा सविस्तरपणे.

पॉझिटिव्ह रुग्णांचे काय आहेत अनुभव....वाचा सविस्तरपणे.

Next

अण्णा नवथर 
अहमदनगर : पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आला किंवा कोरोना झाल्याचा संशय असलेल्या नातेवाईकाला खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचा रिपोर्ट हातात पडेपर्यंतच दोन-तीन दिवसात बिलाचा आकडा २५ हजारांवर जातो़ अहवाल आल्यानंतर तेथून पुढे दररोज १० हजार याप्रमाणे, दहा दिवसांचे एक लाख रुपये बिल भरावे लागते़ हे झाले लक्षणे नसलेल्या रुग्णांचे़ ज्यांना लक्षणे आहेत, अशा व्यक्तींचे बिल यापेक्षाही जास्त असते, अशी व्यथा एका रुग्णाने ‘लोकमत’कडे व्यक्त केली.

कोविड रुग्णांसाठी खासगी व सरकारी, असे दोन पर्याय आहेत़.

सरकारी रुग्णालयात संपूर्ण उपचार मोफत मिळतात़ खासगी रुग्णालयात महात्मा फुले जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार मिळतील, असे सरकारकडून वारंवार सांगितले जात आहे़ प्रत्यक्षात ही योजना लागू असलेले नगर शहरासह जिल्ह्यात एकही कोविड सेंटर नाही़  त्यामुळे जनआरोग्य योजनेचा लाभ मिळालेल्या रुग्णांची संख्या शून्य आहे़ खासगी रुग्णालयांनी प्रति दिवस किती बिल आकारावे, हेही सरकारने निश्चित केले आहे़ मात्र त्याहीपेक्षा जास्त बिलाची आकारणी होत आहे़ पॉझिटिव्ह रिपोर्ट असलेल्या रुग्णाला रुग्णालयात दाखल करतानाच ३० ते ४० हजार रुपये डिपॉझिट भरावे लागते़ एका रुग्णाला किमान दहा दिवबूथ हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार पालिकेच्या कोविड चाचणी केंद्रात तपासणी केली़ अहवाल पॉझिटिव्ह आला़ स्वत:ची पॉलिसीही होती़ परंतु, मी बूथ हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याचे ठरविले़ तिथे अ‍ॅडमिट झालो़ त्यामुळे चाचणीपासून ते डिस्चार्ज मिळेपर्यंत एकही रुपया खर्च आला नाही़ त्यांनी वेळेवर औषधे दिली़ चांगल्या प्रकारे काळजी घेतली, असे बरे होऊन घरी आलेल्या रुग्णाने सांगितले़स अ‍ॅडमिट राहावे लागते़ आॅक्सिजन, व्हेंटिलेटरची आवश्यकता नसली तरी ५ ते १० हजार रुपये मोजावे लागतात.


जिल्हा रुग्णालयात खर्च नाही़ उपचारही मोफत आहेत़ परंतु, तिथे रुग्णांकडे डॉक्टर लक्ष देत नाहीत़ केवळ पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आले, म्हणून थांबवून ठेवले जाते़ चार ते पाच दिवस त्यांना कोणतीही माहिती दिली जात नाही़ आरोग्य सेविका येतात, गोळ्या देवून निघून जातात, असे एका रुग्णाने सांगितले.

जनआरोग्य सेवा ३८ रुग्णालयांत,
पण कोविडसाठी एकही नाही. 

शहरासह जिल्ह्यातील ३८ खासगी रुग्णालयांत महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना लागू आहे़ मात्र, कोविड रुग्णांवर या योजनेतून उपचार देण्यासाठी एकाही रुग्णालयाने अर्ज केलेला नाही़ त्यामुळे या योजनेचा लाभ एकाही कोविड रुग्णाला मिळाला नाही, असे या योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ़ वशिम शेख यांनी सांगितले.

रुग्णांच्या जेवणाची आबळ
जिल्हा रुग्णालय व्यवस्थापनाकडून अल्पोपहार व जेवण वेळेवर दिले जात असल्याचा दावा सपशेल खोटा आहे़ रुग्णांना वेळेवर चहा, अल्पोपहार आणि जेवण मिळत नाही़ सकाळचा अल्पोपहार बाराच्या सुमारास येतो़ दुपारच्या जेवणास साडेतीन वाजतात़ संध्याकाळचे जेवण तेवढे वेळेवर मिळते, असे एका रुग्णाने सांगितले.

तुमचे रेकॉर्डच आले नाही 
तर घरी कसे सोडणार जिल्हा रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णांना १० दिवसात घरी सोडले जाते़ या रुग्णालयातील एक आजीबाई आहेत़ त्या ठणठणीत झाल्या आहेत़ त्यांचा कालावधीही संपून गेला आहे़ त्या घरी सोडण्याची विनवण्या करत आहेत़ परंतु, तुमचे रेकॉर्ड मिळाले नाही़ त्यामुळे तुम्हाला घरी सोडता येणार नाही, असे उत्तर आजीबार्इंना आरोग्य सेविकांकडून दिले जात असल्याचे सांगण्यात आले.

वाचवू कुणाला आईला की वडिलांना
आईचा अहवाल पॉझिटिव्ह आला म्हणून तिला खासगी रुग्णालयात दाखल केले़ तिला रुग्णालयात दाखल करून घरी आलो तर माझ्यासह वडील आणि बहिणीला क्वारंटाईन करण्यात आले़ आई एकटी रुग्णालयात आहे़ तिच्याकडे लक्ष द्यायला कुणीही नाही़ वडिलांना पॅरालेसेस आहे़ त्यांच्या गोळ्या घरी राहिल्या़ त्यांनाही आता त्रास होऊ लागला आहे़ तिकडे आईही रडते आहे़ डॉक्टरांना फोन केला तर कुणीही फोन उचलत नाही़ आता तुम्हीच सांगा वाचू कुणाला ? आईला की वडिलांना, अशी व्यथा एका युवकाने व्यक्त केली.

त्रास होत असल्याने जिल्हा रुग्णालयात चाचणी केली़ दुसºया दिवशी अहवाल पॉझिटिव्ह आला़ पुढील उपचार खासगी रुग्णालयात घेण्याचा निर्णय घेतला़ रुग्णालयात दाखल झालो़ रुग्णालयात दाखल होताना ३० हजार रुपये डिपॉझिट भरावे लागले़ दहा दिवस रुग्णालयात राहिलो़ आॅक्सिजन व व्हेंटिलेटरची गरज पडली नाही़ विशेष काही उपचारही केले नाहीत़ तरीही एक लाख रुपये बिले झाले़ उपचारापेक्षा दवाखान्याचे भाडेच तीनपट असल्याचे बिल पाहून लक्षात आले, असे एका खासगी रुग्णालयात उपचार घेऊन घरी परतलेल्या रुग्णाने सांगितले.

३० हजार भरून पेशंट दाखल केले
आईला छातीत त्रास होऊ लागल्याने एका खासगी रुग्णालयात दाखल केले़ तिथे कोविड चाचणी केली़ अहवाल येईपर्यंत दोन दिवस गेले़ दोन दिवसांनी अहवाल आला़ तो पॉझिटिव्ह होता़ खासगी रुग्णालयाचे २५ हजारांचे बिल भरले व आईला जिल्हा रुग्णालयात आणले़ तिथे चाचणी केली असता अहवाल निगेटिव्ह आला़ मी गोंधळून गेलो़ त्यामुळे पुन्हा आईला खासगी कोविड सेंटरमध्ये दाखल केले़ तिथे ३० हजार डिपॉझिट भरले़ आईचा पूर्वीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने माझ्यासह वडील आणि बहिणीला दुसरीकडे क्वारंटाईन करण्यात आले आहे़ त्यामुळे आईकडे लक्ष द्यायला कुणीही नाही़ रुग्णालयानेही पुढे काही कळविले नाही, असा अनुभव एका रुग्णाच्या नातेवाईकाने सांगितला.

पाच दिवस झाले; ना डॉक्टर आले ना अहवाल
आईचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता़ तिचा मृत्यू झाला़ अत्यंसंस्कार करून घरी झोपलो होतो़ रात्री उशिराने साडेअकरा वाजता रुग्णवाहिका दारात येऊन उभी राहिली़ डॉक्टरांनी सांगितले चला लवकरच तुमच्या सर्वांची तपासणी करायची आहे़ रात्री सगळ्यांना उठवले़ सामान बरोबर घेण्यासाठी पिशव्या भरू लागलो़ पण पिशव्याही भरू दिल्या नाही़ आहे त्या कपड्यानिशी जिल्हा रुग्णालयात आणले़ स्त्रावाचे नमुने घेऊन पाच दिवस झाले़ पाच दिवसात ना डॉक्टर आले, ना अहवाल! अशी व्यथा जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाने सांगितली.

२९०० ते ३००० 
मोजावे लागतात़ नॉन कोविड पेशंट रुग्णालयात दाखल झाल्यास त्यांची प्रथम टेस्ट करून घेतली जाते़ ही टेस्ट खासगी प्रयोगशाळेतील डॉक्टर येऊन करतात़ त्याचा अहवाल दोन दिवसांनी येतो़ तोपर्यंत साधारण  २० ते २५ हजार बिल होते़ अहवाल पॉझिटिव्ह आल्यास रुग्णाला कोविड सेंटरमध्ये घेऊन जाण्यास सांगितले जाते़ विशेषत: ग्रामीण भागातून येणाºया रुग्णांबाबत असे घडते़ याशिवाय बेड चार्ज, नर्सिंग चार्ज द्यावा लागतो़ याशिवाय मेडिकलचे बिल वेगळे असते.

Web Title: What are the experiences of positive patients .... read in detail.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.