‘हम दो हमारे दो’ कडे वाढला कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 11:41 AM2018-05-29T11:41:25+5:302018-05-29T11:41:25+5:30

‘छोटे कुटुंब, सुखी कुटुंब’ ही संकल्पना आत्मसात करत शहरी भागासह ग्रामीण भागात ‘हम दो हमारे दो’ कडे कल वाढत आहे. जिल्ह्यात एप्रिल महिन्यात मागीलवर्षीच्या तुलनेत ९५५ जास्त शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. अनेक अडचणींवर मात करत ग्रामीण भागातही छोट्या कुटुंबाची बिरुदावली रुजविण्यात आरोग्य विभाग यशस्वी ठरत आहे.

We have grown to 'two two of us' | ‘हम दो हमारे दो’ कडे वाढला कल

‘हम दो हमारे दो’ कडे वाढला कल

googlenewsNext
ठळक मुद्दे कुटुंब कल्याण कार्यक्रम जिल्ह्यात अडीच हजार शस्त्रक्रियाग्रामीण भागात वाढली जागृकता

अण्णा नवथर
अहमदनगर : ‘छोटे कुटुंब, सुखी कुटुंब’ ही संकल्पना आत्मसात करत शहरी भागासह ग्रामीण भागात ‘हम दो हमारे दो’ कडे कल वाढत आहे. जिल्ह्यात एप्रिल महिन्यात मागीलवर्षीच्या तुलनेत ९५५ जास्त शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. अनेक अडचणींवर मात करत ग्रामीण भागातही छोट्या कुटुंबाची बिरुदावली रुजविण्यात आरोग्य विभाग यशस्वी ठरत आहे.
जिल्ह्यात मागीलवर्षी एप्रिलमध्ये १ हजार ६६१ कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया झाल्या. या तुलनेत चालू वर्षात एप्रिल महिन्यात २ हजार ६१६ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यापैकी दोन अपत्यांवर १ हजार ८७२ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. दोन अपत्यांवर सर्वाधिक २१८ शस्त्रक्रिया नगर तालुक्यात करण्यात आल्या. दोनपेक्षा जास्त अपत्यांवर शस्त्रक्रिया करणाऱ्यांची संख्या ७४४ एवढी आहे. ग्रामीण कुटुंबांमध्ये जागरुकता वाढत आहे.  एक किंवा दोन अपत्यांवर शस्त्रक्रिया करणा-यांची संख्या गतवर्षी १ हजार १७२ होती़ चालू वर्षी त्यात वाढ होऊन ही संख्या १ हजार ८७२ झाली आहे.  दोनपेक्षा अधिक अपत्यांवर शस्त्रक्रिया करणा-यांच्या संख्येत घट होत असून, एक किंवा दोन अपत्यांवर शस्त्रक्रिया करणाºयांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढहोत असल्याचे चित्र आहे.

दोनपेक्षा अधिक अपत्यांवर ७४४ शस्त्रक्रिया
जिल्ह्यात मागील एप्रिल महिन्यात २ हजार ६१६ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्यापैकी दोनपेक्षा जास्त अपत्यांवर ७४४ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.  जामखेड तालुक्यात सर्वाधिक ८४ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

असा मिळतो भत्ता
कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करणाºया महिलेस ५०० रुपये दिले जातात़ पुरुषास दीड हजार रुपये मिळतात. प्राथमिक आरोग्य केंद्रांत शस्त्रक्रिया केल्यास जाण्या-येण्यासाठी वाहन, राहण्याची सुविधा दिली जाते़ मोफत औषधोपचार केले जातात.

९० प्रसूती-गृह
जिल्ह्यात एकूण ९६ प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत आहेत. त्यापैकी ९० प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रसूतीगृह कार्यरत आहेत.  प्रसूतीगृहात अत्याधुनिक सुविधा असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात शस्त्रक्रिया करण्याकडेही कल वाढत आहे.

दोन अपत्यांवर शस्त्रक्रिया
जामखेड- १८९, पाथर्डी-१५४, शेवगाव-१७३, कर्जत-११७, राहाता-१७२, नगर- २१८, श्रीरामपूर-९०, श्रीगोंदा-१२७, पारनेर-११२, अकोले-१०९, कोपरगाव-८३, नेवासा-१२३, संगमनेर-१३७, राहुरी-६८

जिल्ह्यात विविध शिबिरांचे आयोजन करून कुटुंब कल्याण कार्यक्रमाबाबत विशेष जागृती करण्यात आली़ आरोग्य विभागाने केलेल्या नियोजनामुळे हे शक्य झाले -संदीप सांगळे, आरोग्य अधिकारी

 

Web Title: We have grown to 'two two of us'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.