आढळातील पाणी पिण्यासाठी राखीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 01:27 PM2018-05-23T13:27:43+5:302018-05-23T13:28:08+5:30

अकोले तालुक्यातील आढळा धरणाचा पाणीसाठा कमी होत असल्याने शिल्लक पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. मंगळवारी धरणात १९३ दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता.

Water reserved for drinking water | आढळातील पाणी पिण्यासाठी राखीव

आढळातील पाणी पिण्यासाठी राखीव

googlenewsNext

अकोले : अकोले तालुक्यातील आढळा धरणाचा पाणीसाठा कमी होत असल्याने शिल्लक पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. मंगळवारी धरणात १९३ दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता.
लाभक्षेत्रातील वीरगाव, पिंपळगाव निपाणी, हिवरगाव आंबरे, डोंगरगाव व गणोरे या पाच गावांसाठी पिण्याचा नळपाणी पुरवठा याच धरणातील पाणीसाठ्यावर अवलंबून आहे. या पाचगाव नळपाणी योजनेच्या उपसापंपापासून धरणातील पाणीसाठा दूर सरकत आहे. पाणी पातळी खोल तळाकडे गेल्यास नळपाणी योजनेसाठी पाणी टंचाईची झळ बसू शकते. आता धरणात १९३ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामधील ८५ दशलक्ष घनफूट पाणी मृत साठ्यातच आहे.
गेल्या पावसाळ्यात धरणात पूर्ण क्षमतेने एक हजार ६० दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता. दरम्यान, लाभक्षेत्रातील शेतक-यांच्या मागणीनुसार रब्बी हंगामात दोन व उन्हाळी हंगामात एक पाण्याचे आवर्तन जलसंपदा विभागाने दोन्ही कालव्यांना सोडले होते. लाभक्षेत्रातील सुमारे एक हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांसाठी सिंचनाचा लाभ झाला. आता शिल्लक पाणीसाठा राखून ठेवण्यात आला आहे.

 

Web Title: Water reserved for drinking water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.