अन्याय विरुद्ध न्यायाची लढाई

By admin | Published: October 3, 2014 11:58 PM2014-10-03T23:58:59+5:302014-10-03T23:58:59+5:30

पाथर्डी : पंकजा मुंडेच्या मागे सर्वांनी शक्ती उभी करा़ , असे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भगवानगडावर जमलेल्या मुंडे यांच्या कार्यकर्त्यांना दिले़

The war of injustice against injustice | अन्याय विरुद्ध न्यायाची लढाई

अन्याय विरुद्ध न्यायाची लढाई

Next

पाथर्डी : दुर्बल घटकांसाठी स्व. गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्य झिजविले़ तोच वारसा आता पंकजा मुंडे चालवित आहे़ त्यांच्या मागे सर्वांनी शक्ती उभी करा़ त्यांचा योग्य सन्मान केला जाईल, असे आश्वासन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भगवानगडावर जमलेल्या मुंडे यांच्या कार्यकर्त्यांना दिले़ महाराष्ट्रात अन्याय विरुद्ध न्यायाची लढाई असून यामध्ये न्यायाचा विजय होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला़
भगवानगडावर गेल्या ३५ वर्षापासून स्व. मुंडे दसरा मेळाव्याला आवर्जून हजेरी लावत आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत़ मात्र, त्यांच्या निधनानंतर भगवानगडावर होणारा हा पहिलाच दसरा मेळावा शुक्रवारी झाला़शहा भाषणाला उठल्यानंतर गर्दीमधून पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित करा अशा घोषणा होऊ लागल्या़ ते पाहून मी या ठिकाणी राजकीय वक्तव्य करण्यासाठी नाही तर भगवानबाबांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे, असे सांगत शहा यांनी वेळ मारुन नेली़
पंकजा मुंडे म्हणाल्या, तुम्ही माझ्यासोबत आहात, हीच माझी खरी ताकद आहे. आज या ठिकाणी गर्दी व उत्साह असला तरी वातावरण उदास आहे़ कारण माझे बाबा या ठिकाणी नाहीत. त्यांनी आयुष्यभर सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी संघर्ष केला़ तोच वारसा मी चालवित आहे. माझी लढाई कोणत्या पक्षाशी तसेच थातूर-मातूर नेत्यांशी नाही़ माझी लढाई नियतीशी आहे. महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आणायची हे मुंडे यांचे स्वप्न होते़ ते पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे़ महाराष्ट्रात बळीराजाचे राज्य आणल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, अशी गर्जना मुंडे यांनी केली़
यावेळी गडाचे महंत नामदेव शास्त्री, एकनाथराव खडसे, गुजरातचे मंत्री शंकरभाई चौधरी, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, शिवसंग्रामचे विनायक मेटे, प्रीतम मुंडे-खाडे, खा. दिलीप गांधी, आ. शिवाजी कर्डिले, आ.राम शिंदे,मोनिका राजळे,अमित पालवे उपस्थित होते.
(तालुका प्रतिनिधी)
पंकजा यांना अश्रू अनावर
स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या अनुपस्थितीत शुक्रवारी भगवानगडावर पहिलाच दसरा मेळावा झाला़ या मेळाव्यास अभूतपूर्व गर्दी जमली होती. मागच्या दसरा मेळाव्यात स्व. गोपीनाथ मुंडे यांनी केलेल्या भाषणाची फित या मेळाव्यात ऐकविण्यात आली़ ते ऐकताना आ. पंकजा मुंडे यांना गहिवरुन आले. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनाही अश्रू आवरणे कठिण झाले़

Web Title: The war of injustice against injustice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.