विखे हे कायमच नामदार : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 05:53 PM2019-05-09T17:53:04+5:302019-05-09T17:57:26+5:30

विखे पाटील परिवार हा तीन पिढ्यांपासून समाजसेवेत आहे. त्यामुळे राधाकृष्ण विखे यांचे विरोधी पक्षनेतेपद गेले असले तरी ते कायमच नामदार असतील.

Vikarka is always nominated: Chandrakant Patil | विखे हे कायमच नामदार : चंद्रकांत पाटील

विखे हे कायमच नामदार : चंद्रकांत पाटील

googlenewsNext

लोणी : विखे पाटील परिवार हा तीन पिढ्यांपासून समाजसेवेत आहे. त्यामुळे राधाकृष्ण विखे यांचे विरोधी पक्षनेतेपद गेले असले तरी ते कायमच नामदार असतील. असे सांगून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विखे यांच्या भाजप प्रवेशाची उत्सुकता कायम ठेवली. दरम्यान, गुरुवारी लोणीत काँग्रेस नेते, कार्यकर्त्यांऐवजी कार्यक्रमाला भाजप नेत्यांचीच उपस्थिती होती. त्यामुळे विखे यांचा भाजप प्रवेश निश्चित समजला जात आहे.
पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी लोणी येथे भेट दिली. यावेळी मंत्री पाटील पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, छावणी धारकांसाठी लवकरच एक स्वतंत्र अ‍ॅप विकसित करून त्याद्वारे अधिक पारदर्शक कारभार केला जाईल. शेतकरी, पिण्याचे पाणी आणि चारा छावणी याबद्दल चुकीची माहिती दिली जाते. वस्तुस्थिती समजून घेऊन बोलणे आवश्यक आहे. आचारसंहिता शिथिल झाल्याने आता सरकारला देखील निर्णय घेता येतील.
 

Web Title: Vikarka is always nominated: Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.