... तर जलसमाधी घेऊ

By admin | Published: September 21, 2014 11:46 PM2014-09-21T23:46:10+5:302014-09-21T23:49:37+5:30

राहुरी : बहुचर्चित मुळा धरणावरील विमान सेवा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे़

... then take the water resources | ... तर जलसमाधी घेऊ

... तर जलसमाधी घेऊ

Next

राहुरी : बहुचर्चित मुळा धरणावरील विमान सेवा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे़ धरणावर विमान उतरल्यास जलसमाधी घेऊ, असा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिल्याने विमान सेवा सुरू होण्याबाबत संधिग्दता आहे.
याबाबत सोमवारी (दि. २२) सकाळी ११ वाजता राहुरी तहसील कचेरीत तहसीलदार राजश्री आहिरराव यांच्या समवेत कंपनीचे संचालक व प्रकल्पग्रस्तांची बैठक होणार आहे. संघटनेचे अध्यक्ष अण्णासाहेब बाचकर व प्रकल्पग्रस्त पंढरीनाथ पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत प्रकल्पग्रस्तांनी या प्रकल्पास विरोध दर्शवला आहे. विमान सेवेमुळे पाण्यात आॅईल गळेल. परिणामी प्रदूषण होईल़ मुळा धरणासाठी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांचे पूर्णपणे पुनर्वसन झालेले नाही. जोपर्यंत ते होत नाही, तोपर्यंत विमान उतरू देणार नाही. आमचा विरोध डावलून विमान सेवा सुरू केली तर धरणात जलसमाधी घेऊ, असा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला.
शंकर बाचकर, भास्कर काळनर, दगडू बाचकर, बाळासाहेब आघाव, सुरेश बाचकर, साहेबराव आघाव, रामभाऊ आघाव, रामभाऊ आघाव, कोंडिराम बाचकर, अर्जुन तमनर, सोपान होडगर, शिवाजी बाचकर, शरद बाचकर, सूर्यभान गाडे, अनिल माने, रामदास ससाणे, रोहिदास अडांगळे, संदीप बाचकर, संतोष बोरूडे आदींनी आपल्या व्यथा मांडल्या़
तहसीलदार आहिरराव, डॉ़ उषाताई तनपुरे, मुळा पाटबंधारे खात्याचे कार्यकारी अभियंता आनंद वडार, धरण अभियंता राजेंद्र कांबळे, उपअभियंता दिलीप नवलाखे यांनी प्रकल्पग्रस्तांशी चर्चा करून उपोषण मागे घेण्याची विनंती केली़ कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन आहिरराव यांनी दिले़

Web Title: ... then take the water resources

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.