शिक्षक दिन विशेष : उपक्रमशील शिक्षिका लता गवळी घडवताहेत विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 12:51 PM2018-09-05T12:51:03+5:302018-09-05T12:51:08+5:30

कर्जत तालुक्यातील माही जिल्हा परिषद शाळेत गेल्या काही वर्षात विविध शालोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या शिक्षिका लता गुलाबराव गवळी या यंदा राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत.

 Teacher's day special: Students undertaking ventilated teacher Lata Gavali | शिक्षक दिन विशेष : उपक्रमशील शिक्षिका लता गवळी घडवताहेत विद्यार्थी

शिक्षक दिन विशेष : उपक्रमशील शिक्षिका लता गवळी घडवताहेत विद्यार्थी

googlenewsNext

मुन्ना पठाण
कर्जत : कर्जत तालुक्यातील माही जिल्हा परिषद शाळेत गेल्या काही वर्षात विविध शालोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या शिक्षिका लता गुलाबराव गवळी या यंदा राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत.

क्षिका गवळी यांनी शालेय शिक्षणासह विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यात मोठा वाटा उचलला. त्यादृष्टीने त्यांनी शाळेत विद्यार्थी, पालकांच्या मदतीने अनेक उपक्रम राबविले. आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांची शास्त्रीय माहिती, यासह उत्कृष्ट स्नेहसंमेलन, आजी विशेष भेट, विद्यार्थी सहल माता-पालकांसह, तारांगण भेट, विद्यार्थी गृह भेट, शालेय आनंद बाल मेळावा, तिन्ही भाषेत विद्यार्थ्यांची भाषणे, वनभोजन, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, दरवर्षी महापुरूषांची जयंती आणि पुण्यतिथी साजरी करणे, कवायत साहित्य, पालक सहकार्य, जरबेरा फार्म भेट, रेल्वे स्टेशन भेट, विद्यार्थी वाढदिवसानिमित्त मिष्टान्न भोजन, उत्कृष्ट शालेय पोषण आहार, शिवार फेरी, महिला मेळावा, हळदी-कुंकू कार्यक्रम, नेत्यांची वेशभूषा, मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषेत परिपाठ आदी उपक्रम राबवले. या सर्व उपक्रमांची दखल घेत त्यांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली. शिक्षकदिनी (दि.५) या पुरस्काराने त्यांचा गौरव होणार आहे.

तंत्रस्नेही विद्यार्थी
लता गवळी यांनी शाळेत अध्यापनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचीही मदत घेतली आहे. पहिलीपासून चौथीपर्यंतची मुले सफाईदारपणे टॅब वापरतात. कॉम्प्युटरवर शालेय अभ्यासक्रम चाळतात, तर एलईडी टीव्हीवर शैक्षणिकदृष्ट्या उपयोगी चित्रफित पाहतात. ही शाळा कोणत्याही शहरातील शाळेपेक्षा कमी नाही किंवा येथील विद्यार्थी शहरी विद्यार्थ्यांपेक्षा तसूभरही कमी नाहीत.

 

Web Title:  Teacher's day special: Students undertaking ventilated teacher Lata Gavali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.