मुंबईतील टाटा कॅन्सरमधील डॉक्टरांच्या लक्झरीचा अपघात; चालक ठार, ३० डॉक्टर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 10:46 AM2018-09-01T10:46:46+5:302018-09-01T16:51:45+5:30

मुंबईतील 'टाटा कॅन्सर' हॉस्पिटल व इतर हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या लक्झरी बसला आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अहमदनगरमधील केडगाव बायपासजवळ भीषण अपघात झाला.

Tata's cancer hospital's luxury accident in Mumbai; Driver dies, 30 doctors injured | मुंबईतील टाटा कॅन्सरमधील डॉक्टरांच्या लक्झरीचा अपघात; चालक ठार, ३० डॉक्टर जखमी

मुंबईतील टाटा कॅन्सरमधील डॉक्टरांच्या लक्झरीचा अपघात; चालक ठार, ३० डॉक्टर जखमी

googlenewsNext

अहमदनगर : मुंबईतील 'टाटा कॅन्सर' हॉस्पिटल व इतर हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या लक्झरी बसला आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अहमदनगरमधील केडगाव बायपासजवळ भीषण अपघात झाला. यामध्ये बसचालक जागीच ठार झाला तर अन्य ३० डॉक्टर जखमी झाले आहेत. जखमींना अहमदनगरमधील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पहाटे चार वाजता केडगाव बायपासवर हा अपघात झाला. मुंबईवरुन वेरूळकडे निघालेल्या लक्झरी बसमध्ये एकूण ४० डॉक्टर प्रवास करत होते. औरंगाबादमध्ये होणा-या मेडिकल कॉन्फरन्ससाठी हे डॉक्टर निघाले होते. केडगाव बायपासजवळ भरधाव वेगात असणारी लक्झरी बस पाठीमागून कंटेनरला धडकली. या भीषण अपघातामध्ये अर्ध्या लक्झरीचा चक्काचूर झाला. डॉ. पुष्कर इंगळे, अनिल टिबडेवाल, जानी कार्टन हे तीन डॉक्टर गंभीर जखमी झाले आहेत. अन्य डॉक्टर किरकोळ जखमी झाले आहेत.


दरवाजाच्या काचा तोडून जखमींना काढले बाहेर 
समोर जाणाºया कंटनेरला बसची धडक बसल्यानंतर बस कंटनेच्या पाठीमागील बाजूस अडकली़ यावेळी बस ५० फुटापर्यंत कंटनेरने ओढत नेली़ ही बाब कंटनेरचालकांच्या निदर्शनास अल्यानंतर त्याने कंटनेर थांबविले़ यावेळी या अपघातात बसचच्या पुढील बाजूचा चक्काचूर झाल्याने चालक टेरिंगच्या मध्ये अडकून मृत्यू झाला होता़ जखमी झालेल्या क्लिनरने इमजर्सी दरवाजाच्या काचा तोडून जखमींना बाहेर काढले़ 

अपघातील जखमी 
दिपांजली अडुलर, भाविण विसारिया, आशिष भांगे, स्वाती चुघ, हर्षित, प्रिथी, मनिष मदाने, आस्फिया खान, त्रिरंजन बास, दीपक कुमार, जाहीद मुलानी, सायोग डे,  सचिता पाल, आकांक्षा अनुप, जिन्स मॅथ्यू, निष्ठा सेहरा, प्रशांत नायक, पल्लवी खुरूड, जिमी मंजली, प्राची सावंत, अजय शशीधरन, अनुजकुमार, समर्पिता मोहंती, प्रारब्ध सिंग, अमेरेंद्र कुमार, सुचिता पॉल, वेदांत मूर्ती, सागर गायकवाड, केतकी अडसुळ, उन्मेष मुखर्जी, कस्तुरी वरवा, उपासना सक्सेना, सचिन आनंद, जिफ्मी जोस, निशिता सेहरा, रवी शंकर दास हे किरकोळ जखमी आहेत़ 

 

Web Title: Tata's cancer hospital's luxury accident in Mumbai; Driver dies, 30 doctors injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.