लोकमतचा ‘ग्लोबल नगरी’शी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 05:12 AM2017-08-17T05:12:28+5:302017-08-17T05:12:30+5:30

‘लोकमत’ने परदेशातील नगरकरांची दखल घेऊन ख-या अर्थाने भूमिपुत्रांना न्याय दिला आहे.

Talk to Lokmat's 'Global City' | लोकमतचा ‘ग्लोबल नगरी’शी संवाद

लोकमतचा ‘ग्लोबल नगरी’शी संवाद

Next

अहमदनगर : ‘लोकमत’ने परदेशातील नगरकरांची दखल घेऊन ख-या अर्थाने भूमिपुत्रांना न्याय दिला आहे. त्यांचा हा उपक्रम नवीन पिढीला प्रेरणादायी आहे. हा केवळ ‘ग्लोबल नगरी’शीच संवाद नव्हे तर लोकमत खºया अर्थाने ग्लोबल झाला आहे, अशा शब्दांत परदेशात स्थायिक असलेल्या भूमिपुत्रांनी ‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव केला.
अमेरिका, फ्रान्स, डेन्मार्क येथून त्यांनी १५ आॅगस्टला ‘लोकमत’च्या वर्धापनदिन विशेषांकाचे प्रकाशन केले. लोकमत अहमदनगर आवृत्तीच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित स्नेहमेळाव्यात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे परदेशी भूमिपुत्रांनी लोकमत टीम,पाहुण्यांशी संवाद साधला. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, आ. शिवाजी कर्डिले, आ. राहुल जगताप तसेच भूमिपुत्रांच्या नातेवाईकांनी त्यांच्याशी आॅनलाईन संवाद साधला.
अमेरिकेत ४०० एकर जमिनीचे मालक असणारे हरिदास भोगाडे यांचे निंबोडी हे मूळ गाव कर्डिले यांच्या मतदार संघातच येते. त्यांच्यात खुशखुशीत चर्चा झाली. अमेरिकेतील शेती काय म्हणते, तिकडे दुधाचे भाव काय आहेत’, असे म्हणत कर्डिले यांनी भोगाडे यांना बोलते केले. अमेरिकेत शेती शासनाच्या भरवशावर आहे. सरकारकडून सर्व सुविधा मिळतात, परंतु येथे शेतीकामाला गडी मात्र मिळत नाहीत, असे भोगाडे म्हणाले़

Web Title: Talk to Lokmat's 'Global City'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.