विद्यार्थ्यास मारहाण : तीन शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 04:39 PM2019-01-24T16:39:03+5:302019-01-24T16:39:47+5:30

काष्टी येथील रयत शिक्षण संस्थेच्या जनता विद्यालयात आठवीच्या वर्गात शिकणा-या एका विद्यार्थ्याला किरकोळ कारणावरुन विद्यालयातील तीन शिक्षकांनी जबर मारहाण केली.

Student gets assault: Three teachers | विद्यार्थ्यास मारहाण : तीन शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल 

विद्यार्थ्यास मारहाण : तीन शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल 

Next

काष्टी : काष्टी येथील रयत शिक्षण संस्थेच्या जनता विद्यालयात आठवीच्या वर्गात शिकणा-या एका विद्यार्थ्याला किरकोळ कारणावरुन विद्यालयातील तीन शिक्षकांनी जबर मारहाण केली. मुलाची आई रुपाली माने यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन श्रीगोंदे पोलिसांनी या एच. पी. शिंदे व ढवळे, खामकर या शिक्षकांविरुध्द बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 ‘मुलगा काल बुधवारी शाळेतून घरी आल्यावर त्याला शिक्षकांनी मारहाण केल्याचे सांगितले. त्याच्या चेह-यासह अंगावर मारहाण झाल्याचे व्रण होते. शाळेच्या मधल्या सुट्टीत त्याचे वगार्तील एका मुलासोबत भांडण झाले होते. त्याचा राग धरून शिक्षक एच. पी. शिंदे, वर्गशिक्षक खामकर व ढवळे या तिघांनी त्याला जबर मारहाण केल्याचे फिर्या दीत म्हटले आहे. 

Web Title: Student gets assault: Three teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.