नाचताना बॅन्जो बंद केल्याने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 04:29 PM2018-06-02T16:29:27+5:302018-06-02T16:29:27+5:30

लग्नाच्या वरातीत नवरदेवासमोर तरूण नाचत असताना बॅन्जो बंद केल्याने दोघा तरूणांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी नऊ जणांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेंडी शिवारातील शितळा देवी मंदिर परिसरात ३० मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजता ही घटना घडली.

Struggling to stop banjo from dancing | नाचताना बॅन्जो बंद केल्याने मारहाण

नाचताना बॅन्जो बंद केल्याने मारहाण

Next

अहमदनगर: लग्नाच्या वरातीत नवरदेवासमोर तरूण नाचत असताना बॅन्जो बंद केल्याने दोघा तरूणांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी नऊ जणांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेंडी शिवारातील शितळा देवी मंदिर परिसरात ३० मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजता ही घटना घडली.
याप्रकरणी अनुग्रह सोना देठे (वय २८ रा़ शेंडी पोखर्डी) याने फिर्याद दाखल केली आहे. शेंडी परिसरात लग्नसोहळ्यानिमित्त सायंकाळी तरूण बॅन्जो लावून नाचत होते. यावेळी अनुग्रह देठे याचा पुतण्या जितेंद्र याने बॅन्जो बंद केला. याचा राग येऊन त्याला केतन सुरेश त्रिंबके, बाळू पाटेकर, करण परसराम गुंड, अशय सोपान कराळे, बापू अनिल शिंदे, सागर भाऊसाहेब कराळे, दिनशे उर्फ गोट्या नवनाथ रोडे, बबलू दत्तात्रय गुंड व सिद्धार्थ सुरेश काळे यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. अनुग्रह देठे भांडण सोडविण्यासाठी गेला असता या नऊ जणांनी त्यालाही मारहाण केली. घटनेनंतर देठे याला जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी १ जून जून मारहाण करणाऱ्या नऊ जणांविरोधात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास कॉस्टेबल एस.एन.बडे हे पुढील तपास करत आहेत.

Web Title: Struggling to stop banjo from dancing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.